जळगाव जिल्हा

डॉ.संभाजीराजे पाटील फाउंडेशन सदैव आपल्या सोबत-डॉ.संभाजी राजे पाटील


कासोदा ता.एरंडोल (प्रतिनिधी)


डॉक्टर संभाजीराजे पाटील फाउंडेशन सदैव आपल्या सोबत अशी ग्वाही डॉ. संभाजी राजे पाटील फाऊंडेशन तथा साई हॉस्पिटल पारोळा कासोदा चे डॉ. संभाजी राजे पाटील यांनी भातखेडे येथील अन्नदान कार्यक्रमात दिली.
एरंडोल तालुक्यातील भातखेडे गावातील ग्रामस्थ दर सोमवारी भक्तिभावाने महादेव मंदिरात आरती तथा धार्मिक कार्यासाठी एकत्र येतात यावेळी “प्रसाद तथा अन्नदान” कार्यक्रम होत असतो.

या सातत्याने सुरू असलेली उपक्रमाचे स्वरूप हे आज विशाल झालेले दिसतेय. पुढील अनेक सोमवार अन्नदानासाठी इच्छुक असणाऱ्या भाविकांनी आरक्षित करून ठेवलाय.

या धार्मिक कार्याला गावकऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जोड देऊन वृक्षारोपन करून परिसर निसर्ग संपन्न करण्याचा निर्धार केला आणि डॉ संभाजीराजे पाटील फाऊंडेशन यांच्या पर्यावरण विभागाने वृक्षरोपन तसेच संगोपनासाठी पुढाकार घेतला.
यानिमित्ताने डॉ संभाजीराजे पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . यावेळी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले त्याचबरोबर ग्रामस्थांसोबत प्रसाद स्वरूपातील सहभोजन करण्यात आले.

वृक्षारोपण सारख्या आदर्श उपक्रमासाठी गावाने एकत्र येऊन एक विचारे एक दिलाने काम करताना बघून मनस्वी आनंद वाटला तसेच समाजोपयोगी उपक्रमासाठी डॉ संभाजीराजे पाटील फाउंडेशन सदैव आपल्यासोबत उभे राहील. अशी ग्वाही डॉ संभाजीराजे पाटील यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी गुणवंत पाटील तंटामुक्त अध्यक्ष हनमंतखेडे , रवींद्र पाटील पारोळा रवींद्र पाटील कासोदा राम ठाकूर नांदखुर्दे अनिल कोळी पारोळा राकेश पाटील पारोळा व गावातील आजी माजी सरपंच पोलीस पाटील व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!