शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना यश; तहसीलदारांनी पंचनामे करण्याचे दिले आदेश.
भडगाव-
परतीचा पावसामुळे भडगाव तालुक्यात सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी ज्वारी सोयाबीन मका यासह खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यासंबंधी शेतकरी संघटनेने सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा यासंबंधीत मागणीचे निवेदन तहसीलदार साहेबांना दिले होते. त्या अनुसरून भडगाव तहसीलदार यांनी कृषी विभागाला पंचनामे करण्याचे पत्र दिले आहे.
भडगाव तालुक्यात दिनांक १३ ते २१ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस वादळ वाऱ्यामुळे खरीप हंगामातील कापूस, मक्का,सोयाबीन,ज्वारी इत्यादी पिकांचे सततच्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले होते. याप्रकरणी संपूर्ण भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागात सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अखिलेश पाटील, वाल्मीक लोखंडे, सरदारसिंग पाटील, लक्ष्मण बोरसे, भिला माळी.ई शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले होते. या मागण्या मान्य करत मा.तहसीलदार साहेबांनी भडगाव तालुक्यात पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभाग व महसूल विभाग यांना दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.