आता एकच निर्धार वैशालीताई सुर्यवंशी बनणार आमदार अभूतपूर्व प्रचार फेरीने दुमदुमले पिंपळगाव हरेश्वर.
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आज महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांची भव्य रॅली निघाली असून याला जनतेचा अभूतपुर्व प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले आहे.
पाचोरा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर वैशालीताई सुर्यवंशी या उमेदवारी करत असून त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. प्रचार करण्याआधीच त्यांनी आधी किमान चार वेळेस मतदारसंघातील जनतेच्या घरोघरी जाऊन संवाद साधत त्यांना आवाहन केले आहे. तर आज प्रचार फेरीच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा जनतेचा कौल मागितला.
सकाळी साई मंदिर आणि श्री गोविंद महाराज देवस्थानात वैशालीताई आणि नरेंद्रसिंगदादा यांनी पूजन करून विधानसभा निवडणुकीत विजयासाठी साकडे घातले. यानंतर पिंपळगाव हरेश्वरमधून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. यात महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याप्रसंगी ताईंनी गावाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन परिवर्तनाच्या लढाईत सहकार्य देण्याचे आवाहन केले. त्यांचे ठिकठिकाणी अतिशय उत्स्फुर्त असे स्वागत करण्यात आले. या निवडणुकीत वैशालीताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आमदार बनविण्याची ग्वाही याप्रसंगी मतदारांनी दिली.
याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत नरेंद्रसिंग सुर्यवंशी, उध्दव मराठे, रमेश बाफना आदी मान्यवरांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष, युवासेना, युवतीसेना तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.