नानासाहेब प्रताप हरी पाटील यांना तांदुळवाडी, भोरटेक, पासर्डी या परिसरात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
भडगाव-
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांनी दिग्गजांवर मात करून प्रचारात प्रचंड आघाडी घेतली घेतली असून त्यांच्या रॅलीची सर्वत्र चर्चा चालू आहे आज दिनांक 8 नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी सकाळी तांदुळवाडी या गावापासून प्रचाराची सुरुवात श्रीराम मंदिर येथे नारळ वाहून करण्यात आली करण्यात आली त्यानंतर घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्याने सर्वत्र औक्षण करण्यात आले व स्वराज्य पक्षाचे सप्तकीरणातील पेनाची निप हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्यात आले या प्रचारादरम्यान त्यांच्यासोबत शिवाजी पाटील, माजी सरपंच बी वाय पाटील, माजी सभापती अभिमन सीताराम पाटील व स्थानिक कार्यकर्ते निंबालाल पाटील, दादाभाऊ पाटील, अमोल पाटील ,भाऊसाहेब पाटील, जिभाऊ पाटील हे या रॅलीत सामील होते या प्रचारादरम्यान ठिकठिकाणी कॉर्नर सभा ही घेण्यात आल्या या कॉर्नर सभेसाठी पक्षाचे समन्वयक चेतन पाटील, प्रमुख प्रवक्ते चंद्रकांत ठाकरे ,दीपक भोसले, भडगाव तालुका अध्यक्ष प्रतीक पाटील ,गौतम बाविस्कर इत्यादी प्रतिनिधींनी कोठली, घुसर्डी, भोरटेक इत्यादी ठिकाणी सकाळी तर संध्याकाळी पिंपरीहाट, कोळगाव या ठिकाणी कॉर्नर सभा घेऊन नानासाहेब प्रताप हरी पाटील यांचा व स्वराज्य पक्षाचा प्रचार व प्रसार केला या प्रचार रॅली प्रसंगी नानासाहेबांना गावोगावी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत असल्याने मतदारांनी त्यांना विजयी करून आणण्याचे आश्वासन दिले या रॅलीमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून या रॅलीची सर्वत्र चर्चा होत आहे.