देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या जवानांना वैशालीताई सुर्यवंशी यांनी दिल्या शुभेच्छा.
पाचोरा –
दिनांक 02/10/2023 रोजी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला यात बाळद बु. येथे सुरेंद्र विनायक सोमवंशी यांनी 17 वर्षे अखंड देश सेवा करून भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सौ वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी अरुण सोमवंशी आणि प्रकाश मोरे सह समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
तसेच भडगाव येथे शेख रऊफ दगडू मणियार हे इंडियन आर्मी मधून आपल्या सतरा वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल ताईसो यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले. याप्रसंगी गणेश परदेशी, योजना ताई पाटील, माधव पाटील व जे.के पाटील आदी उपस्थित होते.
यानंतर पाचोरा येथे सेवापूर्ती समारंभात अनिल शालिक पाटील यांनी 22 वर्षे इंडियन आर्मीत आपला कार्यकाळ पूर्ण केला आणि सेवानिवृत्त झाले या वेळी ताईसो यांनी श्री अनिल पाटील यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी श्री नरेंद्रसिंग सूर्यवंशी आणि पप्पू राजपूत सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.