घरफोडीचा गुन्हा लागलीच उघडकीस आरोपीस केले जेरबंद..
जळगाव-
दिनांक 02/12/2024 रोजी दुपारी 14.00 ते 22.00 वाजेच्या दरम्यान यातील फिर्यादी नामे अनिल हरी ब-हाटे वय 64 वर्ष रा. सोमनाथ नगर, शिवशक्ती कॉलनी, भुसावळ जि. जळगाव यांच्या घराची मागील लोखंडी खिडकी कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडुन घरात प्रवेश करून घरात ठेवलेले 33 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये 2,60,000/-रुपये रोख असा एकुण 28,55,000/-रु. कि.चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेल्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 458/2024 भारतीय न्यांय संहीता कलम 331(4),331(3), 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा हा उघडकीस येणे करीता मा. पोलीस अधिक्षक जळगाव श्री महेश्वर रेड्डी, तसेच मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कृष्णात पिंगळे भुसावळ भाग भुसावळ यांनी सदरचा गुन्हा उघडकीस यावा या करीता दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी गुन्हे शोध पथकातील पो. उपनिरी./ मंगेश जाधव, पोहेका./2692 विजय नेरकर, पोहेका./ 2816 निलेश चौधरी, पोहेका./ 3189 रमण सुरळकर, पोहेका. /631 उमाकांत पाटील, पोना./सोपान पाटील, पो.का./3398 प्रशांत परदेशी, पो.का./272 भुषण चौधरी, पो.का. / राहुल वानखेडे, पो.का./293 योगेश माळी, पो.का./59 जावेद शहा अश्यांचे पथक तयार करुन त्यांना योग्य त्यासुचना देवुन गुन्ह्याचा तपास करीत असतांना आम्हाला गुप्त बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली कि, फिर्यादी यांचा जवाई राजेंद्र शरद झांबरे रा. फेकरी ता. भुसावळ जि. जळगांव हा कर्जबाजारी झालेला आहे. अशी माहिती मिळाल्याने आम्ही गुन्हे शोध पथकातील पोलीस अमंलदारांना माहिती देवुन त्यांना राजेंद्र शरद झांबरे रा. वरीलप्रमाणे याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्याने गुन्हे शोध पथकाताली अमंलदार यांनी लागलीच राजेंद्र शरद झांबरे यास भुसावळ शहरातुन ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्याच्या कडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मालापैकी 23 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 2,60,000/-रुपये रोख असा एकुण 21,05,000/-रु.कि.चा मुद्देमाल त्याने काढुन दिल्याने तो सदर गुन्ह्याचे तपासकामी दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे. तसेच सदर आरोपीताने गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी इतर 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने 7,50,000/-रुपये किमंतीचे चोरी केल्याचे कबुली दिली असुन सदर गुन्ह्याचे तपासात मुद्देमाल हस्तगत करीत आहोत. असा एकुण 28,55,000/-रु.कि.चे सोन्याचे दागिने व रोख रुपयाचा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कार्यवाही मा.पो. निरीक्षक श्री राहुल वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अमंलदार पो.उपनिरी./ मंगेश जाधव, पोहेका./2692 विजय नेरकर, पोहेका. / 2816 निलेश चौधरी, पोहेका./3189 रमण सुरळकर, पोहेका./631 उमाकांत पाटील, पोना. सोपान पाटील, पो. का./3398 प्रशांत परदेशी, पो. का./272 भुषण चौधरी, पो. का. / राहुल वानखेडे, पो. का. /293 योगेश माळी, पो. का./59 जावेद शहा अशांनी केली आहे.