जळगाव जिल्हा
भातखंडे येथील तरुण शास्त्रज्ञ गोपाल महाजन यांना मोजॅक कंपनी फाउंडेशनने, यंग सायंटिस्ट अवॉर्डने केले सन्मानीत

भडगाव-
भातखंडे ता भडगाव येथील रहिवासी तथा तरुण शास्त्रज्ञ गोपाल रामदास महाजन हे येथीलच कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांना नुकताच २०२२/२३ चा मोजॅक कंपनी फाउंडेशन सायंटिस्ट अवार्ड प्लांट न्यूट्रिशन क्षेत्रात मिळाला आहे. अवार्डचे स्वरूप प्रमाणपत्र सुवर्णपदक आणि रोख रक्कम १५००००/- रुपये असून त्यांना या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. पूनमताई प्रशांत पाटील, संस्थेचे सचिव प्रशांतराव विनायकराव पाटील, तसेच गावातील ग्रामस्थ व पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे.





