लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा
भडगाव-
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले तसेच महान स्त्रियांच्या वेशभूषा साकारल्या. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचरित्रावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. निधी वाडेकर, रुपश्री महाजन, अनुश्रुती महाजन, सानवी शिंदे, गुंजन पाटील, योगिनी पाटील, जानवी गावंडे, दीक्षा सरदार, प्रेरणा बागुल, अश्विनी अहिरे, पूर्वा वाघ, स्वरा कासार, मयुरी गुरव, मनस्वी पाटील, प्रांजली पाटील या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली. प्रांजल अहिरे,ममता पाटील, लावण्या महाजन, सोहम गुरव या विद्यार्थ्यांनी विविध संत, समाजसेवक व महापुरुषांची भूमिका साकारली. लेक शिकवा अभियानावर जनजागृती करण्यात आली. सुयोग पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले. अनंत हिरे यांनी फलक लेखन केले. शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.