जळगाव जिल्हा

पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने दर्पणकार पुरस्कार, हेल्मेट वाटप..

जळगाव-

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणातून आम्हालाही योग्य तो बोध मिळतो म्हणजे अप्रत्यक्षपणे पत्रकार हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगून जळगाव मधील पत्रकारांसाठी नवी गृह निर्माण सोसायटी काढण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा नियोजन भवन येथे सोमवार रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या दर्पणदिनानिमित्त आयोजित दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार राजूमामा भोळे, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी अनिल जोशी, जिल्हा दूध संघाचे सदस्य अरविंद देशमुख, ज्येष्ठ पत्रकार सचिन जोशी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष  प्रवीणजी सपकाळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोरजी रायसाकडा,  उत्तर महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष सचिनजी गोसावी, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भुवनेशजी दुसाने, विभागीय उपाध्यक्ष प्रा विजय गाढे,अबरार मिर्झा, राकेश सुतार, अनिल आबा येवले,प्रा.सी एन.चौधरी, चेतन महाजन,प्रवीण पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र राजेंद्र खैरनार  आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारीआयुष प्रसाद, आमदार राजूमामा भोळे, डीआयजी दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, संपादक संजय आवटे यांच्या हस्ते प्रिंट मिडियाचे पत्रकार चंद्रशेखर जोशी, सुनील पाटील, सुधाकर जाधव देशदूतचे चेतन साखरे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार किशोर पाटील, संजय महाजन, विजय वाघमारे, डिजिटल मीडियाचे नरेंद्र पाटील, निलेश पाटील, छायाचित्रकार सचिन पाटील यांना दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला.पत्रकारांचे स्थान समाजात खुप मोठे असल्याचे सांगून ते स्थान कायम राहिलं पाहिजे. तुम्ही माध्यमात कामं करणारी बुद्धीजीवी लोकं आहात. त्यामुळे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम तुमच्या हातून होते. हे सगळे करतांना तुमचे आरोग्यही तेवढेचं महत्वाचे असून त्यासाठी सर्व पत्रकारांनी आरोग्य विमा उतरवावा असा महत्वाचा सल्ला आ. राजूमामा भोळे यांनी यावेळी दिला. पोलिसांचे आणि पत्रकारांचे संबंध रोजचेच असतात. पत्रकार म्हणून तुम्हीच तुमचे कर्तव्य बजावता, पोलीस म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो. पत्रकारिता करतांना चुका दाखविणे हे तुमचे काम आहे ते करत रहा. फक्त कोणी तुमच्या पत्रकारितेमुळे नाउमेद होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी देखील मार्गदर्शन केले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले की, पत्रकारांच्या बातमीचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस असावा, त्याच्यासाठी तुमची पत्रकरिता असावी. शासन, प्रशासन जिथे चुकते तिथे त्यांची चुक दाखविण्याचे काम पत्रकारांचे असल्याचे सांगून येथून पुढे एआय हे तंत्र आणि माणूस म्हणून आपण पत्रकार अशी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे योग्य कंटेट तुमच्याकडे असणं आता गरजेचं असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दर्पण हा वारसा फार मोठा आहे. मात्र तो वारसा विसरता कामा नये त्या दृष्टीने आपण काम करत राहिले पाहिजे. जगात काहीही बंद पडेल पण मुद्रित माध्यम बंद पडणार नाही. आजही लोकांचा मुद्रित माध्यमावर लोकांचा विश्वास असल्याचे प्रतिपादन श्री. आवटे यांनी केले.

जाहिरात

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!