तारखेडा खुर्द येथील ३५ वर्षीय इसमाचा गावातील तलावात आढळला मृतदेह.
पाचोरा –
पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील रहिवासी रवींद्र पाटील (वय-३५) याचा दिनांक ३ऑक्टोंबर रोजी ४ वाजेच्या सुमारास गावातील तलावात पाण्यात बुडालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
रवींद्र पाटील( वय ३५) रा.तारखेडा खुर्द तालुका पाचोरा हा पुणे येथे लिफ्ट चे काम करणारा कुशल कारागीर होता.गेल्या दोन वर्षापासून तो गावात आलेला होता, पुन्हा पुणे येथे कामास जातो असे सांगून बॅग भरून तो दोन ते तीन दिवसांपासून घरातून निघालेला होता.
मात्र तो पुणे येथे पोहोचलाच नाही उलट गावालगत असलेल्या स्मशान भुमिच्या मागच्या बाजूला पाण्याच्या तलावात पाण्यात बुडालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा असा परिवार आहे.
पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून, रवींद्र पाटील सोबत नेमके काय घडले, तो तलावजवळ का व कसा गेला, घटना कशी घडली, हे सर्व अस्पष्ट असून या सर्व घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नरेंद्र नरवाडे हे करीत आहेत.