जळगाव जिल्हा

पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबीर, शासकीय सेवा योजना महामेळाव्याचे आयोजन..

पाचोरा-

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली; महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई; जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव; आणि तालुका विधी सेवा समिती पाचोरा तसेच पाचोरा वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम “न्यायालय आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित असून, रविवार, दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता निर्मल इंटरनॅशनल स्कूल, अंतुर्ली, भडगाव रोड, पाचोरा येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी दि. १३ जानेवारी रोजी दिवाणी न्यायालय पाचोरा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश श्री. एस. व्ही. निमसे, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती जी. एस. बोरा, तसेच वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील व इतर वकील बांधव उपस्थित होते. या परिषदेत न्या. जी. बी. औंधकर यांनी पत्रकारांना कार्यक्रमाचे स्वरूप, उद्दिष्ट आणि महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली.
न्या. औंधकर यांनी सांगितले की, “न्यायालय आपल्या दारी” या संकल्पनेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत न्याय व शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. “शासन आपल्या दारी” योजनेच्या धर्तीवर नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ सुलभपणे मिळावेत आणि त्यांना कायदेशीर सहाय्यही उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या महाशिबिराचे उद्घाटन सन्माननीय पालक न्यायमूर्ती श्री. मंगेश एस. पाटील व सन्माननीय पालक न्यायमूर्ती श्री. अभय एस. वाघवसे, उच्च न्यायालय, औरंगाबाद यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. एस. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव हे राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून मा. आयुष प्रताप सिंह, जिल्हाधिकारी, जळगाव; मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव; आणि मा. अॅड. अमोल सावंत, पालक सदस्य, महाराष्ट्र बार कौन्सिल उपस्थित राहणार आहेत.विधी सेवा महाशिबिरामध्ये न्यायालयीन यंत्रणा व शासकीय योजना यांचा प्रभावी मेळ साधला जाणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, लाभ घेण्याच्या अडचणी आणि त्यावरील उपाय यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
न्याय सहाय्य: वंचित व गरजू नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला व सेवा.
शासकीय योजना व माहिती: महसूल, कृषी, वीज वितरण, आरोग्य, परिवहन, शिक्षण, पालिका विभाग, व इतर शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती.
प्रमाणपत्रे व कागदपत्रे: शासनाच्या योजनांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेबद्दल माहिती.शासकीय योजना व माहिती: महसूल, कृषी, वीज वितरण, आरोग्य, परिवहन, शिक्षण, पालिका विभाग, व इतर शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती.
प्रमाणपत्रे व कागदपत्रे: शासनाच्या योजनांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेबद्दल माहिती.    यामध्ये विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारले जातील, जिथे नागरिकांना थेट संवाद साधता येईल.महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सर्व शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
शासनाच्या विविध योजनांचे लाभ जसे की वीज बिल सवलत, कृषी अनुदान, शिक्षण विषयक योजना, अपंगांसाठी सेवा, महिला कल्याण योजना, आरोग्यविषयक सेवा व इतर अनेक सुविधांचा लाभ मिळवून देण्याचा या शिबिराचा उद्देश आहे.विविध योजना लाभार्थींसाठी उपस्थित राहणारे प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरटीओ, मुख्याधिकारी,गटशिक्षणाधिकारी, तसेच जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश हे महाशिबिर जळगाव जिल्ह्यातील पहिलेच असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शासनाच्या योजनांचा कोणताही लाभार्थी वंचित राहू नये हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.कार्यक्रमाचे आयोजक:
मा. जी. बी. औंधकर, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, पाचोरा; मा. एस. पी. सय्यद, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव; अॅड. प्रविण पाटील, अध्यक्ष, ॲड कविता मासरे (रायसाकडा) उपाध्यक्ष ,तालुका वकिल संघ, पाचोरा.संपर्क व अधिक माहिती:महाशिबिरासंदर्भातील अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी वकील संघाचे प्रतिनिधी, तालुका विधी सेवा समिती सदस्य, तसेच शासकीय विभागांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!