जळगाव जिल्हा

मनातल्या मनात रडणाऱ्या बापाला ओळखा-आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा; श्री हंकारे यांचे भावनिक आवाहन.

कासोदा ता. एरंडोल

कुण्या धर्माचा, कुण्या पक्षाचा प्रचार करायला मी आलेलो नाही, मी आई व बाप तुमच्या हृदयात पेरायला आलो आहे, अशी सुरवात करुन श्री हंकारे सर यांनी काही क्षणातच प्रत्येक श्रोत्यांवर भावनिक विजय मिळवला.आणि  “मुलांनो, मनातल्या मनात सर्वात जास्त रडणाऱ्या बापाला तुम्ही कधी पाहिले आहे का? मुलगी सासरी जाताना पहिला हंबरडा आई फोडते. मुलगी आईच्या गळ्यात पळून रडते लहानाची  मोठी केल्यानंतर लग्नानंतर मुलगी , कायमचे माहेर सोडून सासरी जाते तेव्हा ,आई रडते पण बाप सगळ्यांना धीर देतो, हवे ते विचारतो.  मुलीची पाठवणी झाल्यानंतर रिकाम्या मंडपाकडे पाहून बाप किती रडतो.? हे तुम्ही कधी पाहिले आहे का? कपाटातल्या तुमच्या वस्तू पाहून त्याच्या मनातला आक्रोश तुम्ही कधी पाहिला आहे का ?अशा आई बापाचा प्रत्येक श्वासावर तुम्ही प्रेम करा ,असे भावनिक आवाहन -अनेक पुरस्कार प्राप्त , साहित्यिक, व्याख्यानकार वसंत हंकारे यांनी केले.

दि. १७ रोजी क.नं. मंत्री विद्यालयाच्या क्रीडांगणावर कासोदा पोलीस स्टेशनच्या वतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री हंकारे यांचे व्याख्यान आयोजित केले होते .या व्याख्यानासाठी पोलीस उपअधीक्षक श्रीमती कविता नेरकर ह्या अध्यक्षस्थानी लाभल्या होत्या .त्याप्रसंगी माजी जि.प. उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, ज्ञानेश्वर आमले, माजी जि.प.सदस्या महानंदा पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील , युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील (पहेलवान)आदी मान्यवर उपस्थित होते.
    
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार प्रमोद पाटील यांनी केले. तर सूत्र संचालन शेखर पाटील यांनी केले, प्राची शिवदे या विद्यार्थिनीने  एक काव्य सादर केले. “अलीकडे आईसोबत मुलांचेही प्रबोधन करणे गरजेचे आहे, मुलांशी घरात संवाद ठेवा .फक्त मुलींना, दोषी ठरवू नका तर त्यांना धाडसी बनवा.” असे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणात अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर यांनी केले.

तर छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले,सावित्री फुले, फातिमा शेख , ताराराणी यांचे दृष्टांत देत माहेर सोडून आलेल्या आपल्या मुलांसाठी अहोरात्र झटणाऱ्या आईची महती हंकारे सरांनी सांगितली . आई-वडील नसलेल्या आश्रमातील मुलांचे उदाहरण त्यांनी सांगितले. आई- वडिलांना फसवून पोलीस स्टेशनला तुम्ही आई-वडिलांना ओळखत नाही. तेव्हा तुम्हाला तुमचे सर्व लाड पुरवणारे  (आई-वडिल) बाप आठवत नाही का ? नऊ महिने पोटात सांभाळणाऱ्या आई तुम्हाला स्मरत नाही का ? अशी परखड विचारणा त्यांनी मुलांना  व मुलींना केली . त्यानंतर आज पर्यंत ची सगळी चूक तुम्हाला माफ असे म्हणत उपस्थित मुलींना व पालकांना मंचावर बोलवून प्रत्यक्ष गळा भेट करायला लावली , तेव्हा खूपच भावनिक वातावरण तयार झाले होते. वसंत हंकारेंच्या प्रत्येक भावनिक शब्दांसोबत मंडपातील महिला व विद्यार्थ्यींनी अक्षरशः हसमुसून रडत होत्या,नागरिकांना देखील अश्रू लपवता येत नव्हते,वर्दीतले कठोर  एपीआय निलेश राजपूत देखील किती हळवे आहेत, हे संपूर्ण श्रोते अनुभवत होते, कारण ते व्यासपीठासमोरच बंदोबस्तासाठी सर्वांसमोर उभे होते, पण डोळ्यातल्या घळघळ  वहाणार्या आसवांना ते रोखू शकत नव्हते. पंचक्रोशीतील सर्व माध्यमिक शाळांचे आठवी ते दहावी , बारावी पर्यंतचे मुले मुली, त्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक व पालक कार्यक्रमास उपस्थित होते .एवढ्या मोठ्या ग्राउंडवर १३० मंडप व बरकत भरलेले होते. तितकीच गर्दी मंडपाच्या बाहेर देखील होती . एवढी प्रचंड उपस्थिती असूनही उत्कृष्ट नियोजनामुळे सर्व कार्यक्रम शांततेत पार पडला .कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कासोदा पोलीस स्टेशनचे सापोनी. निलेश राजपूत, यांचे सर्व कर्मचारी, ग्रामस्थ, उस्तव व नियोजन समितीचे अध्यक्ष संजय येवले, सर्व कमिटी सदस्य, पत्रकार बांधव, सरपंच  पुरुषोत्तम चौधरी, व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी ,पतपेढी यांचे पदाधिकारी, आर्थिक मदत करणारे सर्व ग्रामस्थ, समाजिक कार्यकर्ते ,सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद,आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस ,सर्व स्वयंसेवक व ग्रामस्थांसह आदींचे  सहकार्य लाभले.

गावकऱ्यांनी या उपक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद दिल्यामुळे हा कार्यक्रम कासोद्याच्या इतिहासात नोंद घेण्याएवढा सुंदर झाला आहे. सर्वांचे मनापासून आभार मानतो या कार्यक्रमामुळे एकही मुलगी आपले घर सोडून जाणार नाही व आई-वडिलांची मान खाली घालणार नाही असे या कार्यक्रमातून जाणून येत आहे. स.पो.नि.निलेश राजपूत कासोदा पोलीस स्टेशन

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!