अपुर्ण रस्त्याचे काम पुर्ण करावे नगरपरिषद प्रशासनास दिले निवेदन-३१ऑक्टोबर पर्यंत काम न झाल्यास साखळी आंदोलनाचा दिला इशारा.
पाचोरा-
पाचोरा येथील गाडगेबाबा नगर अंतुर्ली रोड या भागात जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम अपुर्ण असल्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे म्हणून त्या भागातील परीसरातील नागरीकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशासक श्रीमती बावीस्कर मॅडम यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदरच्या निवेदनाद्वारे त्यांनी असे म्हटले आहे की, आम्ही खालील सह्या करणारे सर्व नागरिक गाडगेबाबा नगर, भास्कर नगर, योगेश्वर नगर, लक्ष्मी अंगण, लक्ष्मी पार्क, शंकर नगर, कृष्णा रेसिडेन्सी, शाहू नगर, व जुना अंतुर्ली रोड वरील भाग या परिसरातील वास्तव्यात असून या सर्व भागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम अपूर्ण स्थितीत असून सक्रिय महामार्ग क्रमांक 753 अ पासून सुरू होणाऱ्या या मुख्य रस्त्याचा काही भाग स्वरूप दर्शन ब्युटी पार्लर पासून ते चिंचेच्या झाडा पावीतो अपूर्ण असून वरील सर्व भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे व सध्याची स्थिती पावसाची असून येथे मोठ्या प्रमाणात चिखल व खड्डे पडल्याने आणि पाणी साचल्याने अपघात होऊन नागरिकांना दुखापत होत आहे.
तसेच याबाबत आपणाकडे दिनांक २३/०९/२०२२ रोजी लेखी स्वरुपात तक्रार केली असून आपणांस दिनांक २२/११/२०२२ रोजी स्मरणपत्र सुद्धा दिले तरी देखील या अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही यामुळे या परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रमाणात रोश निर्माण झाला असून तरी येत्या ३१/१०/२०२३ रोजी पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास आम्ही सर्व नागरिक या संदर्भात दिनांक ०१/११/२०२३ रोजी सामूहिक पद्धतीने साखळी आंदोलन उपविभागीय अधिकारी यांच्या दालना समोर करू यासाठी व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदार आपण राहाल याची नोंद घ्यावी. या आशयाचे निवेदन नागरीकांचा वतीने देण्यात आले.
निवेदन देते वेळी प्रविण पाटील, योगेश ठाकुर,आश्रित खरे, राहूल आहिरे, यांच्या सह परीसरातील नागरीक उपस्थित होते.