जळगाव येथे भाजपा संघटन पर्व अभियान “विभागीय कार्यशाळा” संपन्न..

जळगाव-
जळगाव येथे भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियान उत्तर महारातील जळगांव – धुळे – नंदुरबार जिल्ह्याची “विभागीय कार्यशाळा” आज भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे व कार्यकारी प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी यांचेकडून “भाजपा सदस्यता अभियान” बाबत आढावा घेण्यात येऊन, उत्तर महाराष्ट्रातील पक्षाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. आदरणीय श्री.नरेंद्र मोदीजीं च्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी राज्यात 1 कोटी नागरिकांनी भाजपा पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. आगामी काळात दीड कोटी सदस्यसंख्या असलेला राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनवण्याचे लक्ष्य पार करण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्रजी चव्हाण, मंत्री मा.श्री.गिरीषजी महाजन, मंत्री मा.श्री.जयकुमारजी रावल, आमदार श्री.विक्रांतजी पाटील, श्री.राजेशजी पांडे, प्रदेश सरचिटणीस श्री.विजयजी चौधरी, खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार श्री.विजयकुमार गावित, माजी खासदार डॉ.सुभाषजी भामरे, आमदार श्री.सुरेशजी भोळे, आमदार श्री.मंगेशजी चव्हाण, आमदार श्री.राजेशजी पाडवी, आमदार श्री.अमोलजी जावळे, आमदार श्री.अनुपजी अग्रवाल, श्री.रविजी अनासपुरे, श्री.किशोरजी काळकर यांच्यासह तिन्ही जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

