जळगाव जिल्हा
मिठाबाई कन्या विद्यालयात तालुका विधी सेवा शिबिर संपन्न..

पाचोरा-
पाचोरा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने मिठाबाई कन्या विद्यालयात तालुका विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थिनींना पोक्सो कायदा, अन्न व शिक्षणाचा अधिकार कायदा यासारख्या महत्त्वाच्या कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात अॅड. कविता मासरे-रायसाकडा (उपाध्यक्ष, पाचोरा वकील संघ), ललिताताई पाटील, अॅड. चंचल पाटील, डॉ. प्रा. सौ. सुनीता मांडोळे आणि श्री. नैनव सर यांनी विद्यार्थिनींना कायदेविषयक महत्त्वपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रम अत्यंत खुल्या आणि संवादात्मक वातावरणात पार पडला. यावेळी विद्यालयातील शिक्षकवृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अशा प्रकारच्या शिबिरांमुळे विद्यार्थिनींमध्ये कायद्याबद्दल जागरूकता निर्माण होते आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग होतो, असे मत व्यक्त केले.




