जळगाव जिल्हा

खडकदेवळा -जारगाव येथे होऊ द्या चर्चा कार्यक्रमातून सौ. वैशालीताई यांनी सरकारच्या नाकारतेपणाचा वाचला पाढा.

पाचोरा-

शिवसेना पक्षप्रमुख तथा मा. लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर सुरू असलेल्या *होऊ द्या चर्चा* अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यातील जारगाव आणि खडकदेवळा येथे शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख श्री उद्धव मराठे, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख पाचोरा अनिल सावंत, युवासेना जिल्हा उपाधिकारी संदीप जैन, व युवासेना तालुकाअधिकारी शशिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित दि. 04/10/2023 रोजी सायंकाळी 7:00 ते 9:00 दरम्यान होऊ द्या चर्चा कार्यक्रम संपन्न झाला. होऊ द्या चर्चा कार्यक्रमावेळी सौ. वैशालीताई सुर्यवंशी या म्हणाल्या की, शहरात आणि गावात प्रत्येक घरात लोकांना काय चालू आहे हे माहिती पडले पाहिजे म्हणून *होऊ द्या चर्चा* घेतोय उद्धव साहेबांनी ठोस आणि विधायक काम केले. कोरोनामध्ये महाराष्ट्र आणि धारावी पेटर्नची सगळीकडे चर्चा झाली. ताईंनी महाराष्ट्र व केंद्र सरकारचा लेखाजोखा काढला हे सरकार फक्त थापा मारणारे सरकार आहे उद्धव साहेबांनी शेतकरी मालाला भाव दिला. आता शेतीचे खर्च खूप वाढले सत्याधारांनी पूर्वी आंदोलन घेतले आता काही बोलत नाही. मा. पंतप्रधान मोदी साहेबांनी जी आश्वासने नवनिर्माण भारताचे स्वप्न उभे केले होते ते आज दहा वर्षाच्या काळात जनतेचा भ्रम निराश झाला. मतदार राजांची घोर फसवणूक झाली, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवले, कर्ज वसुली सक्तीची आहे म्हणून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, ताईसो यांनी आव्हान केला की, शेतकरी भावांनी आत्महत्या करू नये आणि आपल्या परिवाराला उध्वस्त करू नये, शेतकरी स्वतःचा जीव धोक्यात टाकतो आणि रात्री शेतात भरणा करायला जातो. उत्पन्नाला हमीभाव नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला दुधाला भाव नाही, शेतकऱ्यांचे पांढरे सोने कापूस पिकाला भाव नाही, खरेदी केंद्र बंद पडलेले, आजही कापूस शेतकऱ्यांच्या घरात पळून आहे, मार्केट कमिटी मध्ये शेतकऱ्यांसाठी काही व्यवस्था नाही कृषी पितामह स्वामीनाथन या जगाचा निरोप घेऊन गेले तरी स्वामीनाथन आयोग लावला नाही. आता शाळांचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न चालू आहे, आणि दारूचे दुकान वाढवण्याचे प्रयत्न चालू आहे. आरोग्याच्या सुविधा कोळमळल्या, इमारती उभ्या केल्यात, डॉक्टर्स, नर्स इतर स्टाफ भरती नाही, साथीच्या लसीकरणाचे औषधे उपलब्ध नाहीत, सर्पदंश, श्वान दंश यावरील औषधे सरकारी रुग्णालयात नाही.

सरकारी दवाखान्यांचे फक्त इमारतीचे टोलेजंग जंगले उभे केले, काळे धन भारतात आले नाही, पंधरा लाख रुपये नागरिकांच्या खात्यात जमा केले गेले नाही, रोजगार उपलब्ध केला नाही, प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली, सुशिक्षित तरुणांच्या जीवनात नैैराश्य निर्माण झाले, महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला पोहोचले, गरिबांची चूल कशी पेटवावी हा प्रश्न उभा राहिला आहे, नवीन धोरणे नव्या योजना फसव्या असून अंबलबजावणी शून्य आहे, महिला अत्याचार, बलात्कार, विनयभंग प्रमाण वाढले असून गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही नाही हे श्रीरामाचे नाव घेऊन राज्य करण्याचं दुर्दैव आहे भाजपा सरकारचं. महाराष्ट्रात महा आघाडीचे शासन होते मा. श्री शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजी ने घेतलेले निर्णय तमाम जनतेच्या हिताचे होते. महाराष्ट्रातील बळीराजाला भक्कम आधार देण्यासाठी कर्जमुक्त करण्यासाठी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी बिना अटी शर्तीची सरसकट कर्जमाफी देऊन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. कापूस व इतर पिकांना हमीभाव दिले. कोरोना हे जागतिक महामारी असताना कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभावून लाखो नागरिकांचे प्राण वाचवले. औषधोपचार ऑक्सिजन पुरवून उपलब्ध करून सुनियोजित बंदाचे नियोजन करून कोरोना महामारी सोबत यशस्वी लढा दिला व जगातील आदर्श मुख्यमंत्री ठरले तरी देखील आणि आता सर्व सुविधा असून तरीसुद्धा दवाखान्यात एक दिवसात 24 ते 25 लोकांचे मृत्यू होत आहे तरी सरकार जागे ना, भाजपाने कटकारस्थान करून सत्तांतर घडवले. हे महापाप केले येणाऱ्या 2024 मध्ये या पापाचा बदला घ्यावा लागेल भाजपापासून देशाला वाचवावे लागेल भाजपा मुक्त देश उभा करण्याची प्रतिज्ञा घेऊया असं ताईसो यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले, सूत्र संचालन शशि पाटील यांनी केले. यावेळी नरेंद्र सिंग सुर्यवंशी, उपतालुकाप्रमुख आबा देसले, कैलास तेली, सर्जेराव पाटील, अर्जुन पाटील, मुकेश पाटील, बबलू गायकवाड, सचिन देवरे, योगेश पाटील, दिलीप पाटील, कृष्णा पाटील, नाना पाटील, लक्ष्मण राठोड, रणजीत पाटील, नाना जाधव, भारत राठोड, भाऊलाल राठोड, सुनील पाटील, दादाभाऊ चौधरी, अजय पाटील सो. मंदाकिनी पारोचे, सो. कुंदन पंड्या, मनोज चौधरी, एडवोकेट गौरव पाटील, संजय चौधरी, भारत पाटील, राजू पाटील, राहुल भाऊ, अनिल पाटील, विजय भोई, दीपक पाटील, शरद पाटील, लाडू भाऊ, गणेश पाटील, भीमराव पाटील, मच्छिन्द्र पाटील, कैलास पाटील सह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!