पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सन्मान.

जळगाव –
दिनांक 8 मे 2025 गुरुवार रोजी जिल्हा विकास समन्वय व दिशा समितीच्या 2024/25 चा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा नियोजन समिती सभागृह जळगाव येथे संपन्न झाला. त्यावेळी जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभामध्ये एकूण 130 अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र आणि पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यामध्ये पाचोरा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री रमेश जाधव यांना फलोत्पादन विषयक उत्कृष्ट कामगिरी साठी गौरविण्यात आले. त्यांनी सन2024/25 मध्ये उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा पदभार स्व पदाचा पदभार सांभाळून अतिरिक्त स्वरूपात सांभाळला होता त्यावेळी त्यांनी पाचोरा उपविभागामध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबागेचे एकूण लक्षांक 720 हेक्टर असताना 1121 हेक्टर स्वाध्य करून दाखवले होते म्हणजेच त्यांनी लक्षांकाच्या 155 टक्के इतके काम करून जिल्ह्यामध्ये आदर्श तयार केला होता.
तसेच त्यांनी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी मध्ये जिल्ह्यात आदर्श तयार केलेला असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली व त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला ,त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर पुरस्कार वितरणाच्या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे ,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पाणीपुरवठा मंत्री माननीय गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कुरबान तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.



