क्राईमजळगाव जिल्हा

गांजा विक्री करणाऱ्यास एमआयडीसी पोलीसांनी केली अटक.

जळगाव-

मेहरुन बागीचा परीसरात गांजा विक्री करणाऱ्या एका संशयितास पोलीसांनी अटक केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की,एमआयडीसी पोलीस स्टेशन नेमणुकीस असलेले पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांना गोपनीय बातमी मिळाली होती की, एक इसम हा मेहरुण बगीचा परीसरात गांजा ताब्यात बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने मोटार सायकल वर फिरत असल्या बाबतची माहिती मिळाली आहे. सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविले असता, त्यांनी स्वतः तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ दत्तात्रय बडगुजर, पोना योगेश बारी, पोका. नितीन ठाकुर, राहुल घेटे, योगेश घुगे अशांचे पथक तयार केले. सदर पथकाने गांजा विक्री करणाऱ्या इसमाचा शोध घेत असतांना तो शिवाजी महाराज उद्यान मेहरुण बगीचा येथे शोध घेता सदर इसमास पळुन जाण्याची संधी न देता त्यास चारही बाजुंनी सापळा रचुन संशयीतास ताब्यात घेतले. त्याचेजवळ एक गांजा भरलेली गोणी मिळुन आल्याने पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांनी शासकिय पंच, फोटोग्राफर, वजनकाटा धारक, फॉरेन्सीक व्हॅन यांना घटनास्थळी पाचारण करुन संशयीत मुकेश विष्णु अभंगे वय 43 वर्ष रा कंजरवाडा तांबापुर जळगाव याचे ताब्यातुन 09 किलो 522 ग्रॅम गांजा आणी होंडा युनीकॉर्न मोटार सायकल असा एकुण 1,07,132/- रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे. पोना प्रदीप चौधरी यांचे फिर्यादीवरुन एनडीपीएस कलम 8 (क) 20 (ब)ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गांजा बाळगणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचीन नवले, पोका चेतन पाटील हे करीत आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सो, मा अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सो, मा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत सो, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशन तर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अवैधरीत्या कोणी अंमली पदार्थाची विक्री करीत असल्यास त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तात्काळ खबर द्यावी. खबर देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन करण्यात आले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!