पाचोरा तालुक्यासह पिंपळगाव हरेश्वर येथे ऑनलाईन चक्रीसह सट्टा मटकाचा सुळसुळात..

पाचोरा-
पाचोरा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सट्टा मटकाच्या एंजटामध्ये वाढ होतांना दिसुन येत आहे.या एंजट लोकांना व जो चक्री मटका चालक संदिप कोण?त्याला कायद्याचा धाक नसल्याचे चित्र दिसुन येत आहे.पाचोरा शहरात जारगाव चौफुली परीसर, भडगाव रोड भागात, बस स्टँड परीसर पिंपळगाव हरेश्र्वर या ऑनलाईन चक्रीसह सह मटक्याचे दुकाने सुरू आहेत, यांच्या डोक्यावर कोणाचा आशिर्वाद आहे की यांच्या वरती कारवाई होत नाही.या ऑनलाईन चक्री आणि मटक्यात दररोज लाखो रुपये खेळुन गमावतात, कर्ज काढून लोकं लालसे पोटी सट्टा, चक्री खेळतांत त्यात तेही पैसे हारल्या नंतर, कर्ज घेतलेले कसे फेडायचे हा प्रश्न उपस्थित होतो,त्या नैराश्यातुन टोकाचे पाऊल काही उचलत आहेत, अनेकांचे संसार उद्धवस्त झालेत हे ऑनलाईन चक्री,व मटक्यात हे स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना गंडावण्याचे काम करत आहेत.दिवसभर ह्या चक्र्या सुरू असतात दोन चार लोखंडी पत्रे घेवून दुकान थाटले जाते काही चक्रीची दुकानेतर चक्क नगरपरिषदेच्या शाॅपिंग मध्येच सुरू आहेत, त्यामध्ये एक एलसीडी टिव्ही लावुन पीसी जोडून लोकांना खेळवतात, यांच्यावरती कठोर कारवाई करत अश्या चक्री, सट्टा मटका चालक विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत हे धंदे पाचोऱ्यासह ग्रामीण भागातुन कायमचे हद्दपार करावे अशी मागणी सुज्ञ नागरिका कडुन जोर धरू लागली आहे.




