जळगाव जिल्हा
15 मार्च रोजी होणार चिंतामणी हॉस्पिटलचे नविन वास्तुचे उद्घाटन.

पाचोरा-(प्रतिनिधी)
पाचोरा शहरात गेल्या दहा वर्षांपासून रुग्ण सेवा देणारे डॉ.विशाल पाटील यांनी अनेक रुग्णांना जिवदान दिले आहे.आता त्यांनी स्वताचे चिंतामणी हॉस्पिटल ची भव्य इमारत उभारली असून.या वास्तुचे उद्घाटन पाचोरा भडगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील,यांचा सह माजी आमदार दिलीप वाघ, निर्मल सिड्सचा संचालिका सौ वैशालीताई सुर्यवंशी,तसेच भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंतामणी हॉस्पिटल चे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
यावेळी विशेष सहकार्य म्हणून, डॉ.भुषण मगर, डॉ.नरेश गवांदे यांचे लाभले आहे,या उद्घाटन सोहळा प्रसंगी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विशाल सुरेश पाटील यांनी केले आहे.

ठिकाण:- सु.भा.पाटील विद्यामंदिर समोर चिंतामणी हॉस्पिटल पाचोरा




