जळगाव जिल्हा

सोयाबीन ६,९४५ रुपये क्विंटल व खरेदीची हमी मिळणे बाबत, भारतीय किसान संघाची निवेदनाद्वारे मागणी..


पाचोरा-

सोयाबीनला ६९४५ /- रुपये क्विंटल,भाव व खरेदीची हमी मिळणे बाबत, भारतीय किसान संघाच्या वतीने पाचोरा नायब तहसीलदार कुमावत यांना निवेदन देण्यात आले आहे.सदरच्या निवेदनात त्यांनी असे म्हटले की,महाराष्ट्रात सोयाबीन हे क्र.२ चे मुख्य नगदी पीक आहे. राज्यात यावर्षी सुमारे ५० लाख हेक्टर क्षेत्र या पीकाखाली आहे. राज्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी १४.५६ क्विंटल आहे. राज्याचा सरासरी उत्पादन खर्च ६०३१ रु. क्विंटल आहे त्या अनुषंगाने राज्य सरकारने CACP (कृषि लागत एवं मूल्य आयोग) कडे प्रती क्विंटल ६९४५/- दर दिला जावा अशी शिफारस केली आहे, ती रास्त आणि योग्य आहे. म्हणून आम्ही समस्त शेतकरी चालू हंगामात सोयाबीन ला ६९४५/- रु. क्विंटल दर द्यावा अशी मागणी करत आहोत.बाजारात यावर्षी सोयाबीन खरेदीदारांनी संघटीत प्रयत्नातून दरावर नियंत्रण ठेवून दर साडेचार हजारांच्या वर जावू दिले नाहीत. अश्या परिस्थितीत जर शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर लाभकारी किंमत मिळत नसेल तर राज्य सरकारने भावांतर पद्धतीने किंवा बोनस च्या माध्यमातून फरक देण्याची व्यवस्था करावी. निसर्गाच्या प्रकोपाने अतीवृष्टी, किड रोग या कारणाने सरासरी उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी हे सण तोंडावर आलेले आहेत. उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी किंमत व घामाचे दाम अन्नदात्याला मिळून हे सणासुदीचे दिवस सुखाचे जावे ही अपेक्षा आहे. आपण लाडक्या बहिणीचा विचार केलात तसा लाडक्या शेतकरी दादाचा पण निश्चीत विचार करून वरील निर्णय घोषित कराल अशी आशा आहे. या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.संदिप तेली, राजेंद्र बडगुजर, गजानन पाटील, लक्ष्मण पाटील, अशोक तेली,ईश्वर गोरे,किशोर शिनकर, संदिप पाटील,विशाल आग्रवाल,उदय माळी,पवन माळी, संभाजी चौधरी, संतोष तेली, यांचे निवेदनावरती सह्या आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!