जळगाव जिल्हा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल तर्फे ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन

जळगाव-

आदिवासी  बांधवांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या “https://itdpyawal.in/” या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद, जळगावचे आमदार राजू मामा भोळे, पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेतून व  मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमास आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री  इंद्रनील नाईक तसेच आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती लीना बनसोड यांचे मार्गदर्शन लाभले.
या पोर्टलची संकल्पना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार यांची असून त्यामध्ये न्यूक्लियस बजेट योजना, आश्रमशाळा विद्यार्थी प्रवेश, ठक्कर बाप्पा योजना, वनहक्क कायदा, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, शबरी घरकुल योजना, वनधन योजना तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा व वसतिगृह योजना अशा विविध लोकोपयोगी योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रकल्प कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता न राहता, अर्ज ऑनलाइन सादर करता येणार आहे. अर्जाची स्थितीही लाभार्थ्याला पोर्टलद्वारे थेट कळविण्यात येईल.
हा उपक्रम डिजिटल युगात आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!