क्राईमजळगाव जिल्हा

चुलत मामानेच केला भाचीवर अत्याचार, अमळनेर पोलीसांत गुन्हा दाखल..

अमळनेर-

पोटाची खळगी भरण्यासाठी आई – वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे.
एका विवाहित महिलेचा पती दुसऱ्या महिलेबरोबर पळून गेल्याने तिचा खावटीबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. म्हणून ही महिला येथे आई वडिलांकडे राहात होती.महिलेचे आई -वडील दसऱ्यानंतर ऊस तोडायला अहिल्यानगर येथे गेले होते. मुलीचा न्यायालयात खटला सुरू होता म्हणून ते आपल्या मुलीला तिच्या चुलत मामाकडे राहण्यास ठेवून गेले होते.चुलत मामाने आपल्या भाचीला आणि तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत अत्याचार केला. याबाबत पीडित महिलेने दि. २९ एप्रिल रोजी अमळनेर पोलिसात फिर्याद दिली आहे.महिलेच्या फिर्यादीवरून चुलत मामा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!