बाळद बु.येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह चे आयोजन
पाचोरा –
पाचोरा तालुक्यातील बाळद बु.येथे आराध्य दैवत प.पुज्य महेंद्र स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यांच्या अमृतवाणीने किर्तन
दि.०९/१०/२०२३ सोमवार ह.भ.प. रविंद्र महाराज तारखेडेकर.
दि.१०/१०/२०२३ मंगळवार ह.भ.प.स्वप्निल महाराज गिरडकर
दि.११/१०/२०२३ बुधवार पारस महाराज बनोटीकर,
दि.१२/१०/२०२३ ह.भ.प. भरत महाराज म्हसवाडीकर ,
दि.१३/१०/२०२३ ह.भ.प.शारंगधर महाराज श्रीक्षेत्र मेहूणबारेकर,
दि.१४/१०/२०२३ ह.भ.प.रविकिरण महाराज दोंडाईचाकर,
दि.१५/१०/२०२३ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर,
दि.१६/१०/२०२३ सोमवारी ह.भ.प. गोवींद महाराज केकतनिभोंरेकर यांचे रात्री ०८:३० ते १०:३० वाजेपर्यंत काल्याचे किर्तन होईल.
दि.१६/१०/२०२३ सोमवार रोजी सकाळी ७ ते दुपार १ पर्यंत पालखी मिरवणूक सोहळा व सकाळी१० ते संध्याकाळ ५ पर्यंत महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
दि.१३/१०/२०२३ रोजी वृंदावन फाऊंडेशन पाचोरा व राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवा संस्थान पाचोरा यांच्या सौजन्याने महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचा व मोफत रक्त तपासणी शिबीराचा तसेच महाप्रसादाचा, लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळ बाळद बु ता.पाचोरा जि.जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.