जळगाव जिल्हा

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांना सुरुवात..

जळगाव-

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) यांच्या माध्यमातून विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नवउद्योजक व बेरोजगार युवक-युवतींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महामंडळाच्या आदेशानुसार दोन उपकंपन्या स्थापन करण्यात आल्या असून त्यामार्फत पुढीलप्रमाणे योजना राबविण्यात येणार आहेत.

१) उपकंपनी पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
२) राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
या योजनांमध्ये जिल्हा कार्यालय जळगाव येथे पुढील योजना उपलब्ध आहेत
१) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना – रु. १० लक्ष (बँकमार्फत)
२) गटकर्ज व्याज परतावा योजना – रु. ५० लक्ष (बँकमार्फत)
योजनेचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून अर्जदारांनी vjnt.in या वेबसाईटवर अर्ज करणे आवश्यक आहे.
३) २५% बीज भांडवल कर्ज योजना – रु. ५ लक्ष (महामंडळाचा २५% सहभाग, बँकेचा ७५% सहभाग)
४) रु. १,००,०००/- थेट कर्ज योजना – महामंडळाचा १००% सहभाग
तरी इच्छुक विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच, विशेष मागास प्रर्वगातील नवउद्योजक तसेच बेरोजगार युवक युवतींनी महामंडळाच्या vjnt.in या वेब प्रणालीवर अर्ज करावे तसेच थेटकर्ज योजनेसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालयास भेट द्यावी असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे. अर्जासाठी जातीचा दाखला व आधार कार्डची झेरॉक्स प्रती सोबत घेउन अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा संपर्क- ०२५७-२९९३४०२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!