
छत्रपती संभाजीनगर-
छत्रपती संभाजीनगर शहरातील एन-3 परिसरात असलेल्या दोन स्पा सेंटरवर अचानक पोलिसांनी धाड टाकली. यावेळी स्थानिक तरुणांसह काही तरुणी नको त्या अवस्थेत आढळूनआले.
पोलिसांनी तातडीने तरुणांसह १३ तरुणींना ताब्यात
घेतलं. तसेच रोकड, देहविक्रीसाठी लागणारे साहित्य जप्त केले.
३० जानेवारी रात्री ७ वाजता आकाशवाणी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पुंडलिकनगर आणि जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंदकरण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
स्पा सेंटरच्या नावाखाली हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार, गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावण्यात आला. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराची खात्री करून घेतली. त्यानंतर छापेमारी करत १३ तरुणींची सुटका केली. या तरुणी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि म्यानमारच्या असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला मॅनेजरसह अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात वेश्या व्यवसायाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
काहीदिवसांपूर्वी सिडको ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने एन-७ भागातील तांबट एज्युकेशनच्या बिल्डींगमध्ये छापा मारून
कुंटणखान्याचा पर्दाफाश केला होता.
त्यानंतर काँवत यांच्या पथकाने बीड बायपासवरील
सेनानगरात छापा मारून हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय अड्डा उद्ध्वस्त केला होता.दरम्यान, शहरात ५० एजंट कार्यरत असल्याची माहिती तपासातून समोर आली.




