चाळीसगावमध्ये अमली पदार्थांची वाहतूक १४ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

चाळीसगाव-
चाळीसगाव शहर पोलीसांनी तपासणी दरम्यान एका वाहनातून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण १४ लाख ५७ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जळगाव नियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार १६ जुलै रोजी रात्री १ ते ३ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी रात्री ०२:५० वाजताच्या सुमारास भडगावहून नांदगावकडे जाणारी पांढऱ्या रंगाची फोर्स कंपनीची टॅक्स क्रूझर गाडी एम एच १८ बी एक्स ८९४३ ह्या वाहनास तपासणी करीता थांबवण्यात आले.

तपासणीदरम्यान त्या वाहनाच्या सीटाखाली प्लास्टिकच्या बॅगामध्ये ३२ किलो ५० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या अंमली पदार्थाचे अंदाजे बाजारमूल्य २,५७,४१६ रुपये असल्याचे सांगितले जाते. संबंधित वाहनाची किंमत १२ लाख रुपये असून, एकूण मुद्देमालाची रक्कम १४,५७,४१६ रुपये इतकी आहे.
याप्रकरणी राहुल पहाळया पावरा (वय २३), अक्तारसिंग शिवदास पावरा (वय २४), रविंद्र पंडीत पायरा (वय २०), पहाडसिंग कुमार पावरा (वय २४) सर्वजण रा. महादेव दोडंवाड, ता. शिरपूर, जि. धुळे या चार जणांना अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहेत.सदरची कारवाई वरीष्ठांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक अमीत मनेळ यांच्यासह पथकाने केली आहे.




