चक्काजाम आंदोलनात शेतकरी, प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक,सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची बदली करा, पोलीस अधीक्षकांना निवेदन..

कासोदा-ता.एरंडोल
दिनांक २४ जुलै रोजी कासोदा तालुका एरंडोल येथे झालेल्या शेतकरी कर्जमाफी चक्काजाम आंदोलनात कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी त्यांची बदली करण्यात यावी याकरिता पोलीस अधीक्षक जळगाव यांना निवेदन देण्यात आले आहे सदरच्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,कासोदा तालुका एरंडोल येथे पारोळा टी पाईंन्ट ला शेतकरी कर्ज माफी, दिंव्याग बांधव, विधवा भगीनी व कामगार, मेंढपाळ यांच्या पेंशन साठी आणि इतर मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले असता,कासोदा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले त्या ठिकाणी कासोदा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत आले व आंदोलन करणाऱ्या शेतकरी व जनशक्ती प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांना उर्मट भाषा वापरून तुमचं फोटो शेंशन झालं असेल तर ही नौटंकी बंद करा हे असे अपमानास्पद शब्द वापरून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.तरी या घटनेचा निषेध करत या मुजोर पोलीस अधिकारी यांचे वरिष्ठ अधिकारी नाशिक,जिल्हा अधिकारी जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव यांना मेल करत व्हिडिओ पाठला तरी या मुजोर पोलीस अधिकारी यांच्या वर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही तरी आपण या अधिकारी यांचे निलंबन अथवा तडका फडकी बदलीचे आदेश काढावेत अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी आपल्या अधिक्षक दालनात १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार आहेत याची कृपया नोंद घ्यावी.या आशयाचे निवेदन देण्यात आले.सदरच्या निवेदनावर जनशक्ती पक्षाचे एरंडोल तालुका अध्यक्ष सुनिल पाटील उमरेकर, तालुका सरचिटणीस अनिल पाटील,मालखेडा – उमरे गावाचे माजी सरपंच सुनिल दयाराम पाटील, मनोहर मगर,विजय माधवराव महाजन, सुनिल हरगुडे, राजेंद्र फणसे सचिन पाटील, अभिनव पाटील यांच्या सह्या असलेले निवेदन देण्यात आले.




