
उरण- (तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे)
उरण तालुक्यातील वशेणी येथील प्रा. जयदास पाटील शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता ५ वी ते १० वीच्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी गणवेश वाटप करण्यात आले .स्व.संगीता मच्छिंद्र ठाकूर फाउंडेशन धुतूम तर्फे माजी रा.जि .प .सदस्या कुंदाताई वैजनाथ ठाकूर आणि माजी रा.जि. प. सदस्य वैजनाथ मच्छिंद्र ठाकूर यांच्या सौजन्याने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले .या कार्यक्रमा प्रसंगी ऍड .अविनाश ठाकूर उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिरकोन, प्रवीण राम ठाकूर पनवेल तालुका अध्यक्ष शिंदे गट, समाधान कृष्णा कटेकर अध्यक्ष धुतुम ग्रामस्थ मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट,सागर ठाकूर समाजसेवक,गुरुनाथ तांडेल समाजसेवक, प्रा. जयदास पाटील संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील ,संस्थेचे सचिव राकेश पाटील तसेच महात्मा गांधी विद्यालय दिघोडेचे सेवानिवृत्त प्राचार्य नाथा नारायण नाईक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वैजनाथ ठाकूर यांनी भूषविले.नाथा नाईक यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांनी विद्यालयाचा निकाल १०० % लावून विद्यालयाचे नाव तालुक्यात केले पाहिजे. प्रवीण ठाकूर यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी ११२ ताटं दिली.
विद्यालयाचे ग्रंथपाल विश्वनाथ केणी यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण पाटील यांनी केले.





