राज्य

DPC विशेष घटक योजने अंतर्गत वाढीव 13 विद्युत पोल डिपी करीता निधी मंजुर करणे बाबत दिले निवेदन.


सिरोचा जि.गडचिरोली प्रतिनिधी

सदर भागात वीज कनेक्शन नसल्याने त्या परीसरातील नागरीकांना अंधारात वावर करावा लागतो रात्री काहीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण तात्काळ निधी उपलब्ध करून दिला पाहिजे या आशयाचे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात असे म्हटले आहे की, माझ्या लोकसभा क्षेत्रातील मौजा नडीकुडा, ता. सिरोंचा जि.गडचिरोली येथे विद्युत कनेक्शन नसल्याने तेथील नागरीक लाईट पासुन वंचीत आहेत सदर ठिकाणी लाईट नसल्याने तेथील नागरीकांना अंधारात येणे जाणे करणे खुपच अवघड होत असल्याने तेथे विद्युत कनेक्शनची खुपच आवश्यकता आहे.
तरी विषयासंबंधाने लक्ष वेधून त्यावर यथाशीघ्र कार्यवाही करून मौजा नडीकुडा, ता. सिरोंचा, जि. गडचिरोली येथे DPC विशेष घटक योजने अंतर्गत वाढीव 13 विद्युत पोल व डिपी करीता तात्काळ निधी मंजुर करण्यात यावा. पत्रक देते वेळी संदिप कोरेत, वसंत डुरके भाजपा अनु जाती मोर्चा जिल्हा महामंत्री गडचिरोली, किरण जंगगाम राजु जंगगम ,रवींद्र बोलंपल्ली शंकर जिमडे मालय्या सोनारी
मा धनाजी पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देते वेळी उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!