शासकीय रक्कमेचा अपहार, पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल..

पाचोरा-
शेती नावावर नसतांना बनावट दस्तावेज तयार करून 1,20,13,517 हजार रुपये शासकीय रकमेचा अपहार केल्या प्रकरणी पाचोरा तहसील कार्यालयातील तत्कालीन महसूल सहायक सह मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी विरोधात तहसीलदार यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत प्राप्त माहितीनुसार पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, सन 2022 ते सन 2024 पावेतो अमोल सुरेश भोई यांनी स्वतःचा आर्थिक लाभ होण्याचे दृष्टीकोणातुन गणेश हेमंत चव्हाण याचे संगनमताने सन 2022-2023 आर्थिक वर्षामध्ये 122 व सन 2024-2025 आर्थिक वर्षामध्ये 225 असे एकूण 347 व्यक्तींच्या खात्यावर नैसर्गीक आपत्तीमधिल बाधीत शेती पिकांचे अनुदान देणे पात्र नसतांना, त्यांच्या नावावर शेती नसतांना, आवश्यक कागदपत्रे न घेता बनावट यादया तयार करुन राज्य शासनाची, शेतक-यांची, सामान्य जनतेची, प्रशासनाची, अधिकारी व कर्मचा-यांची फसवणुक करुन अशा व्यक्तींना लाभ दिलेला आहे. तसेच जुन ते ऑक्टोंबर 2022 मधिल पंचनाम्यांच्या अभिलेखात खोटे, बनावट शासकिय दस्तऐवज तयार करुन शासकिय कर्मचा-यांच्या बनावट सहया करुन लोकप्रतिनीधींच्या बनावट सहया करुन खोटे दस्तऐवज तयार केले आहे. तसेच तहसिलदार पाचोरा यांचे लॉगीन आय.डी. व पासवर्डचा दुरुपयोग स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी करुन शासकिय संगनकाचा गैरवापर केला आहे. तसेच लाभार्थी यांचेशी संपर्क साधुन त्यांचेकडुन त्यांचे खात्यावर जमा झालेली रक्कम स्वतः करीता काढुण घेतलेली आहे. अमोल सुरेश भोई, तत्कालीन महसुल सहायक यांनी बनावट दस्ताचा वापर करुन एकुण 1,20,13,517/-मात्र (अक्षरी एक कोटी वीस लक्ष तेरा हजार पाचशे सतरा मात्र) इतक्या शासकीय रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने अमोल सुरेश भोई, तत्कालीन महसुल सहायक, पाचोरा व गणेश हेमंत चव्हाण, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी व ज्यांनी ज्यांनी अमोल भोईला आर्थिक अफरातफर करण्यास अनुदानाची शासकिय रक्कम हडप करण्यास मदत केली अशी फिर्याद दाखल केल्याने तत्कालीन महसूल सहायक अमोल सुरेश भोई व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण, पाचोरा या दोघांविरोधात पाचोरा पोलिसात गुरुन428 /2025,भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 316 (4),316(5),318 (4),335,336,(2) (3),340 (2), 3 (5)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार हे करीत आहेत.

