सिद्धिविनायक हॉस्पिटलमधील म.फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या मोफत वैद्यकीय सुविधेमुळे अनेक बालकांना होतोय लाभ;
पाचोरा –
पाचोरा येथे गेल्या पाच वर्षांपासून ‘सेवा आणि समर्पण’ या उदात्त हेतूने रुग्ण सेवा करून प्रामाणिक व विश्वसनीय रुग्णसेवा सिद्धीस नेणाऱ्या “सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” मध्ये महात्मा ज्योतिराव फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेची सुविधा आता उपलब्ध झाली असून या योजनेतील रुग्णांवर मोफत औषधोपचार करणे सुरू झाले आहे.
बालरोग तज्ञ डॉ. सौ. ग्रिष्मा पाटील यांच्या सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये जन आरोग्य योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांनसह नवजात बालकांपासुन ते वय वर्षं 18 पावेतो विविध आजारावर देखील मोफत उपचार आता सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे नवजात बाळांचे काचेच्या पेटीतील उपचार देखील मोफत केले जात असून 18 वर्षा आतील बालकांच्या आजारावर निमोनिया, बालदमा, मिरगीचे झटके, मेंदूचा जंतू संसर्ग, मेंदूत रक्तस्राव, विषबाधा, सर्पदंश, डेंग्यू, मलेरिया अशा गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी व विश्वसनीय पुर्णपणे मोफत उपचार केले जात आहेत.
भडगाव रोड भागातील महाराणा प्रताप चौका जवळ ,गजानन पेट्रोल पंपा समोर, एस एस पाटील कन्ट्रक्शन कार्यालयाच्या वर असलेल्या ” सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” मध्ये जनहितार्थ सुरू करण्यात आलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या मोफत जन आरोग्य योजनांचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. स्वप्निल पाटील व डॉ. सौ. ग्रिष्मा पाटील यांनी केले आहे.
म.फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यासह बाहेर गावाहून रुग्ण उपचारासाठी सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतांना दिसुन येत आहेत.