न्हावा शेवा सी.एच.ए.आधार सामाजिक संस्थेच्या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद..

उरण तालुका (प्रतिनिधी-विठ्ठल ममताबादे)
उरण तालुक्यातील न्हावा शेवा सी.एच.ए.आधार सामाजिक संस्थेमार्फत आजतागायत आधार चषक, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर, अपघात ग्रस्तांना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम राबवले गेले.त्याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत न्हावा शेवा सी.एच.ए.आधार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिनांक १९/०७/२०२५ रोजी उरण, पनवेल आणि पेण विभागातील तब्बल १९ गावांतील २२ रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण २१७७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या साहित्यात एक पॅड आणि एक कंपास पेटीचे वाटप करण्यात आले. या २१ गावांमध्ये प्रामुख्याने खोपटे, कोप्रोली, पाणदिवे, मोठीजुई, कळंबुसरे, चिरनेर, भोम, टाकीगाव, विंधणे, आवरे, पाले, पिरकोन, सारडे, कडापे, वशेणी, पुनाडे, केळवणे, दादर, दिघाटी आदी विविध गावांचा समावेश आहे.या उपक्रमाच्या वेळी रा. जि. प. शाळांमधून सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.आणि उपक्रमामुळे सर्व नागरिकांकडून न्हावा शेवा सी.एच.ए.आधार सामाजिक संस्थेचे भरभरून कौतुक होत आहे.





