जळगाव जिल्हा

भडगावात चहाच्या हॉटेलमध्ये स्फोट;13 जण जखमी

भडगाव-

भडगाव येथील न्यू मिलन चहाच्या हॉटेल मधील डी- फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होवून हॉटेल चालकाच्या मुलासह १२ जण  यामध्ये गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.जखमींना भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्रथमोपचार करून पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल न्यु मिलन टी हाऊस येथे दुपारी दिड वाजेच्या सुमारास डी-फ्रीजच्या कॉम्प्रेसर चा स्फोट झाला त्या स्फोट मध्ये हॉटेल मालकाच्या मुलासह एकरा ते बारा जण जखमी झाले आहेत.दुपारची वेळ असल्याने गर्दीचा ओघ कमी होता.ही घटना सकाळी किंवा संध्याकाळी घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता.असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींवर पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटल पाचोरा येथे उपचार सुरू असून हॉटेल चालक यांचा मुलगा सोहिल मणियार याला पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. यात कर्नाटक येथील एकाचा समावेश आहे.यावेळी या घटनेमध्ये हॉटेल चालकाचा मुलगा सोहिल शेख रफिक (वय 28)-ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव,शेख रफिक शेख रज्जाक (वय 50)-ग्रीन पार्क कॉलनी,भडगाव, इकबाल शेख गाणी (वय 40)-गंजी वाडा, भडगाव,एजाजोद्दीन रियाजद्दीन मुल्ला (वय 32)- जालाली मोहल्ला,भडगाव,मोहसीन शेख शब्बीर (वय 33)- ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव,दिलीप भाटा ठाकरे (वय 60)-साई नगर,भडगाव,भूषण प्रकाश पाटील (वय34)-जुवार्डी,ता.भडगाव,रवींद्र मुकुंदराव सोनवणे (वय 56)-बाळद रोड, भडगाव,राजकुमार मोतीराम पवार(वय 28)- मुदळ,ता.मुदळ,जि. बिजर (कर्नाटक),मयूर पदमसिंग पाटील (वय 28)- वडधे, ता.भडगाव,राहुल बाप्पु पाटील (वय 40)- जामदे, ता.चाळीसगाव,अमोल गोविंद शिंदे (वय 34)- वळूज,ता.खातव,जि. सातारा,गजानन दिगंबर उजेड (वय 28)-पोकळ वडगाव,ता.जालना जिल्हा जालना जखमी झाले आहेत. या जखमींवर भडगाव, पाचोरा,जळगाव,धुळे, येथे उपचार सुरू असून यात जीवित हानी झालेली नाही सदर घटनेची माहिती मिळताच पाचोरा भडगाव विधानसभाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय गाठत जखमींना पुढील उपचारासाठी मदत केली.यावेळी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक व मित्र परिवारांनी गर्दी केली होती. यावेळी बापूजी फाऊंडेशन रुग्णवाहिका चालक,भैय्या पाटील, मनोज पाटील,गोलू शिंदे, सागर पाटील, यांनी यावेळी सहकार्य केले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!