ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरेश्वर येथे सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा यांचेकडून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार”अभियान अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

पाचोरा-
ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरेश्वर व सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल,पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर पिंपळगाव येथे आयोजित करण्यात आले होते.

या आरोग्य तपासणी शिबिरास मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत झालेल्या ह्या शिबिराचे आयोजन डॉ.स्वप्निल पाटील दादा (MD MEDICINE संचालक सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल पाचोरा ) व डॉ. शुभम तेली, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरेश्वर यांनी केले. या आरोग्य तपासणी शिबिरास डॉ.राहुल निकम (बालरोग तज्ञ) डॉ दिव्या सोळुंके (स्त्रीरोग तज्ञ) डॉ नितीन कुमार गेडाम (दंतचिकित्सक) डॉ. पंकज नानकर (आयुर्वेदिक ) डॉ. दौलत निमसे (मानसोपचारतज्ज्ञ ) डॉ. निकिता हजारे (नेत्रचिकित्सक) ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरेश्वर येथील सर्व कर्मचारी यांची मोलाची साथ लाभली. या उपक्रमासाठी सिद्धिविनायक हॉस्पीटल पाचोरा यांचा समावेश महत्वाचा ठरला. गावातील प्रतिष्ठित पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच लाभार्थी उपस्थित होते.

या अभियान मध्ये हृदयरोग, मेंदूरोग, फुफ्फुस विकार, क्षयरोग, एच. आय. व्ही. तपासणी, बी.पी, शुगर, रक्त तपासणी, ECG, हिवताप जनजागरण मोहीम व प्रदर्शन तसेच डेंगू चिकनगुनिया हिवताप व साथीचे रोग संदर्भात माहिती व तपासणी करण्यात आली. सदर कार्यक्रमास ICTC समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी सदर शिबिरात मार्गदर्शन केले व आयसीटीसी वाटप करण्यात आली.सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा येथील संजय पाटील, इम्रान शेख (आरोग्य मित्र), अनिल बर्वे, गोपाल पवार, पिंकी राठोड यांची या शिबिरास मोलाची साथ लाभली.






