जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात डेंग्यू चा आजाराने घेतला 22 वर्षीय तरुणीचा बळी;


पाचोरा –

शहरातील श्री. शांताराम पाटील सर उपशिक्षक तावरे विद्यालय पाचोरा यांची 22 वर्षीय कन्या चेतना शांताराम पाटील हिस डेंग्यूची लागण झाल्याने पाचोरा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पाचोरा शहरातील खाजगी दवाखान्यात ३ दिवस उपचार करण्यात आले होते मात्र परिस्थिती डॉक्टरांच्या हाताबाहेर गेल्याने जळगाव येथील खाजगी दवाखान्यात तात्काळ पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असता.

दिनांक 14 ऑक्टोबर 2023 शनिवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास उपचारा दरम्यान तिची प्राणजोत मालवली तिचा अंत्यविधी आज दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता त्यांचे मुळगावी चिंचखेडे खुर्द ता.पाचोरा या ठिकाणी करण्यात आला, या घटनेने पाचोरा तालुक्यात शोककळा पसरली असून पाचोरा शहरातील खाजगी डॉक्टरांचा हलगर्जी पणा व नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे या तरुणीचा जीव गेल्याची चर्चा सर्वदूर सुरु असून, डेंग्यू हा आजार रोखण्यासाठी अधिकच्या उपाययोजना करणेसाठी पाचोरा नगरपरिषदेने तात्काळ अधिकची पाऊले उचलून पाचोरा शहरास डेंग्यूमुक्त करणेसाठी अधिकचे प्रयत्न सुरु करावे, तालुक्यातील राहिवाश्यांनी आपल्या परिवाराची काळजी स्वतः घ्यावी.

नगरपरीषद विरोधात नुकतेच पाचोरा कॉग्रेस चा वतीने नगरपरिषद चा परीसरात औषध फवारणी करत गांधीगिरी आंदोलन करण्यात आले विविध संघटनांनी शहरात फवारणी स्वच्छता व्हावी या करीता निवेदन दिले आहेत.

पाचोरा नगरपरीषदेने शहरात स्वच्छता,आणि औषध फवारणी, मोठ्या प्रमाणात करावी जेणे करून डेंग्यू आटोक्यात येईल अशी आशा व्यक्त करत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!