जळगाव जिल्हा

बऱ्हाणपूर येथून देवीची मूर्ती आणताना मुर्ती आंगावर पडून ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

जळगाव-

देवीची मुर्ती बऱ्हाणपूर येथून मुक्ताईनगर मार्गे जळगाव कडे नेत असतांना अंगावर देवीची मुर्ती पडल्याने जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील ३५ वर्षीय तरूण संजय उर्फ जितू गोपाल कोळी, जोशी वाडा, मेहरूण यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे मेहरूण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव येथील मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथे नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा देवी बसवण्यासाठी तयारी झालेली होती. त्याकरिता देवीची मूर्ती मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून देवीची मूर्ती आणण्यासाठी मंडळाचे काही कार्यकर्ते हे शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी बऱ्हाणपूर गेले होते,मूर्ती घेऊन येत असताना रात्री 12 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्याजवळ देवीची मूर्ती संजय कोळी यांच्या अंगावर पडल्याने अपघातात संजय मुर्ती खाली दाबला गेल्याने त्यांना मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. कोळी यांच्या कुटुंबियांना भ्रमाणध्वनिवरून माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला. दरम्यान मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जळगाव एमआयडीसी येथील एका कंपनीमध्ये संजय कोळी काम करीत होता.मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!