पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील ग्रामस्थांनी केला शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश

पाचोरा-
दिनांक-17/10/2025
पाचोरा भडगाव विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश जोरदार सुरू आहे. आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 शुक्रवार रोजी पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक (बुद्रुक) येथील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गट शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.योगेश कुमावत, अल्पेश कुमावत, संजय कुमावत, स्वप्निल कुमावत, गणेश कुमावत, सागर कुमावत, राहुल कुमावत, शेखर कुमावत, राजेश कुमावत, विश्वनाथ कुमावत, बाप्पू कुमावत, अंकुश कुमावत, उमेश पाटील, रमेश पाटील, भूषण पाटील, शांताराम नाईक, गजानन नाईक, आदित्य कुमावत, भावेश कुमावत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केला.या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला शिवसेना (शिंदे गट) चे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील, तालुकाप्रमुख विनोद तावडे, किरण पाटील, प्रवीण ब्राह्मणे, विकी बाविस्कर आदींची उपस्थिती होती.सद्यस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आपले बळ वाढवण्यासाठी विविध पक्षातून कार्यकर्त्यांचा शिंदे गटात ओघ सुरू आहे.





