जळगाव जिल्हा
पाचोऱ्यात अखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक संपन्न

पाचोरा-
अखिल भारतीय मराठा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांतजी बनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रविवार रोजी संघटनेची पाचोरा,भडगांव तालुका पदाधिकारी यांची पाचोरा येथे बैठक घेण्यात आली सदरच्या बैठकीस जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख हरिभाऊ तुकाराम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष यशोदिप पाटील भडगाव शहराध्यक्ष जगदीश शिंदे,चेतन शिंदे, आप्पा हटकर हे उपस्थित होते.
बैठकीत आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळात बेरोजगार तरुणांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी निर्माण होणाऱ्या समस्यांवर तसेच सारथी योजने बाबत सविस्तर चर्चा विनिमय करण्यात आली येणाऱ्या काळात आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ जळगांव या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून समस्यांचे निवारण करण्याचे आदेश चंद्रकांतजी बनकर यांनी यावेळी दिले. आभार प्रदर्शन यशोदिप पाटील यांनी मानले.





