कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शिवसेना-युवासेना निर्धार मेळावा व शेतमाल तारण कर्ज योजना उद्घाटन सोहळा.

पाचोरा-
पाचोरा-भडगांव विधानसभेचे, कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसनिमित्ताने 01 नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी ठिक 5 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे शिवसेना-युवासेना निर्धार मेळावा आणि शेतमाल तारण कर्ज योजना 2025-2026 या महत्त्वाच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.या भव्य निर्धार मेळाव्यास पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, मा.श्री.गुलाबराव पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मा.श्री. प्रा. चंद्रकांत सोनवणे, मा.श्री. चंद्रकांत पाटील, मा.श्री. अमोल पाटील, मा.श्री. शिरीष चौधरी, मा.श्री. भाऊसाहेब चौधरी, मा.श्री. सुनिल चोधरी, डॉ. प्रियंका पाटील, मा.श्री. वासुदेव पाटील, मा.श्री. विष्णु भंगाळे आणि सो. सरीला माही यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी दिलासा.
घसरत्या बाजारभावात शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत मूग, उडीद, सोयाबीन, थान (भात), तुर, सूर्यफुल, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, चणा, हळद व कानुषी या पिकांचा समावेश आहे. शेतमालाच्या चालू बाजारभाव किंवा आधारभूत किमतींपैकी जी किंमत कमी असेल, त्या किमतीच्या 70% पर्यंत तारण कर्ज मिळणार असून, केवळ 6% व्याजदराने 6 महिन्यांच्या (180 दिवसांच्या) कालावधीसाठी कर्ज उपलब्ध राहील.
याशिवाय बखार पावतीवरही कर्ज मिळणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे. बखार महामंडळ पाचोरा येथील शेतीमाल तारण पावतीसाठी चालू पिकाचा सातबारा उतारा 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर, आधार कार्ड, बँक पासबुक यांच्या झेरॉक्स प्रती २ पासपोर्ट साईज फोटो आवश्यक असून या योजनेबाबत अधिक माहितीसाठी पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधावा.
सर्व मान्यवरांचे पाचोरा नगरीत सहर्ष स्वागत
या कार्यक्रमाचे आयोजन सभापती, उपसभापती व सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती,पाचोरा-भडगाव यांनी केले असून, मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे.
“शेतमाल तारण योजना आहे ना आपल्या हाती, मग घसरत्या बाजारभावाची नको मनात भीती”









