माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार.


पाचोरा-
पाचोरा शहरात सर्वांचे परिचित असलेले ज्येष्ठ नागरिक राजाराम नागो सोनार ,सचिव के.एस. महाजन सर ,सहसचिव शांताराम चौधरी, उपाध्यक्ष युवराज भगवान महाजन, खजिनदार नाना फकीरा महाजन,संचालक एम. एस. महाजन, छगन पंढरीनाथ महाजन, संतोष दला पाटील या सर्वांनी एकत्र येऊन माऊली जेष्ठ नागरिक संस्थेची स्थापना केली. यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करून जास्तीत जास्त संख्या सभासद म्हणून वाढवण्यात आली संघातर्फे चांगले कार्यक्रम ,उपक्रम करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
पाचोरा भडगाव मतदार संघात तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी आप्पासाहेब भारावून गेले व त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी हायवे लगत दैवयोग मंगल कार्यालयासमोर असलेली दहा हजार चौरस फूट जागा माऊली बहुउद्देशीय जेष्ठ संस्थेसाठी देण्याचे कबूल केले तसेच त्या जागेत मोठा प्रशस्त हॉल बांधून देऊ असे सुद्धा मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले ज्येष्ठ नागरिक म्हणजे वडीलधारी माणसं व त्यांचा आशीर्वाद आज आपल्यासाठी लाभदायी आहे असे त्यांनी बोलतांना सांगितले.
या सत्कार प्रसंगी संघाचे अध्यक्ष श्री अप्पासाहेब राजाराम नागो सोनार, सचिव के.एस. महाजन सर डी .पी. वाणी सर ,दशरथ पाटील, मनोहर काटे सर ,के. आर.पाटील सर, भरत आप्पा गायकवाड ,रमेश मिस्त्री प्राध्यापक सी. एन. चौधरी सर प्रकाश महाजन, एम. एस. महाजन सर ,एम.जी. बडगुजर साहेब,चंद्रसिंग तोमर, दिगंबर बाबा, किशोर मराठे, छगन पंढरीनाथ पाटील, अरुण जोशी आबाजी तात्या शांताराम चौधरी सर,राजेंद्र नागणे व इतर सर्व सभासद उपस्थित होते.





