चेतना रणदीप हिरे यांची भाजप “बेटी बचाव, बेटी पढाओ” तालुका अध्यक्षपदी निवड

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील वरखेडी गावचा अभिमान असलेल्या कु.चेतना रणदीप हिरे यांची भारतीय जनता पार्टीच्या “बेटी बचाव, बेटी पढाओ” पाचोरा तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पाचोरा तालुका तसेच वरखेडी ग्रामस्थांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.भाजपच्या परिवर्तन मेळाव्यात हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या वेळी खासदार सौ. स्मिताताई वाघ, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, दिलीपभाऊ वाघ, अमोलभाऊ शिंदे, प्रतापनाना पाटील, वैशालीताई सूर्यवंशी आणि नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते कु.चेतना हिरे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या प्रसंगी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. “जय भारत, जय भाजपा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थित मान्यवरांनी चेतना हिरे यांच्या नेतृत्वगुणांचे आणि सामाजिक जाणिवेचे विशेष कौतुक केले.कु. चेतना हिरे या शैक्षणिक क्षेत्रातही तितक्याच उज्ज्वल कामगिरीसाठी ओळखल्या जातात. विद्यार्थिनी म्हणून त्यांनी उत्कृष्ट वकृत्व, लिखाणकला, आणि सामाजिक सहभाग या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण नेतृत्वशैलीमुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे तरुण पिढीसाठी त्या प्रेरणास्त्रोत ठरत आहेत.स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि युवा वर्ग यांनी या नियुक्तीचे मनःपूर्वक स्वागत करताना असा विश्वास व्यक्त केला आहे की, त्यांच्या कार्यकाळात “बेटी बचाव, बेटी पढाओ” ही मोहिम नव्या जोमाने आणि सामाजिक परिवर्तनाच्या उद्दिष्टाने पुढे नेली जाईल.





