काकणबर्डी परिसरात जवाहर हायस्कूल गिरडने राबविले स्वच्छता अभियान

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील ओझर जवळील’काकणबर्डी देवस्थान येथे दरवर्षी चंपाषष्टीच्या दिवशी खंडेराव महाराज यांची मोठी यात्रा भरत असते. या परिसरातील भाविक भक्तांचे ते श्रद्धास्थान असून खंडेराव महाराज देवस्थान आलेल्या भक्तांचे स्वागत करून यात्रा यशस्वीतेसाठी परिश्रम घेत असते. दरवर्षी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्याल गिरड याच्या वतीने सालाबादप्रमाणे ‘काकणबर्डी स्वच्छता अभियान राबवत असते यावर्षी देखील हे अभियान राबविण्यात आले. यावेळी काकणबर्डी ता पाचोरा येथील यात्रेनंतर झालेल्या घाणीचे चित्र अतिशय विदारक असते. ते विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ केले जाते. या उपक्रमाची दखल विविध संस्थांनी तसेच सह्याद्री वाहिनीने देखील घेतलेली आहे. यावर्षी देखील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन काकणबर्डी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक वाय. ई. पाटील, पर्यवेक्षक एन व्ही सावंत जुनिअर कॉलेजचे कार्यवाह प्रा. यु वाय पाटील, प्रा. डी डी भोसले, एन एम भागवत बी जी भदाणे, के एन चौधरी, व्ही पी पाटील, श्रीकांत बोरसे, काशिनाथ पाटील, रमेश धनगर, शशिकांत पाटील, तुषार मोरे, कैलास पाटील, कैलास जी पाटील, राजकिरण पाटील आदींनी परिश्रम घेऊन हे अभियान यशस्वी केले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था देखील मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली होती. या उपक्रमाचे कौतुक चेअरमन प्रतापराव पाटील, जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ. पूनम पाटील तसेच मंत्रालयातील अवर सचिव प्रशांत पाटील, शालेय समितीचे चेअरमन शिवाजीराव पाटील आदींनी केले आहे.





