Blog

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून नगरदेवळा येथे अडीचशे एकर क्षेत्रावर एमआयडीसीला मिळाली चालना…

भडगाव-

नगरदेवळा सुतगिरणीजवळ मंजूर असलेल्या एमआयडीसीच्या अंतर्गत कामांच्या अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10/12/2025 रोजी दुपारी सव्वा चार वाजता नागपुर येथे अधिकाऱ्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उद्योग मंत्री यांना पत्र दिले होते. त्याची दखल घेत ही बैठक लावण्यात आली आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांतून नगरदेवळा येथे सुमारे अडीचशे एकर क्षेत्रावर एमआयडीसी मंजुर झाली आहे. तेथील जागा आरक्षित करून तेथे उद्योग उभारणीसाठी प्लाॅटींगचे काम पुर्ण झाले आहे. तर आता उद्योग उभारण्यासाठी येथे उद्योगासाठी आवश्यक मुलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. त्याबाबत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र दिले होते. त्याअनुषंगाने मंत्री उदय सामंत यांनी दिनांक 10 डिसेंबर बुधवार रोजी नागपुर येथे औद्योगिक वसाहतीच्या मुख्य कार्यालयात दुपारी सव्वा चार वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एमआयडीसीला चालना मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान नगरपरिषदे च्या निवडणुकीच्या वेळेचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे प्रचारासाठी आले होते. तेव्हा सभेतूनच उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना काॅल करून नगरदवेळा सूतगिरणी येथील मंजूर एमआयडीसीत आवश्यक सुविधा आणि उद्योग उभारण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्यापाश्वभुमिवर एमआयडीसी ला चालना मिळाली आहे.

प्रतिक्रिया
पाचोरा-भडगाव तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळविण्यासाठी माझी धडपड आहे. त्या अनुषंगाने येथील मंजुर एमआयडीसीत उद्योगासाठी आवश्यक सोयीसुविधा करून उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. ही बैठक त्यादृष्टीने खुप महत्वाची आहे.
-किशोरआप्पा पाटील
आमदार -पाचोरा-भडगाव

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!