जोगलखेडे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद उत्साहात.

जामनेर-
जामनेर- तालुक्यातील जोगलखेडे येथे नाचनखेडे केंद्राची पाचवी शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या डिजिटल मार्गदर्शक सूचनेनुसार सकारात्मक शिस्त या विषयावर मार्गदर्शन केले. “मुलांना शिक्षा करण्यापेक्षा मुलांचे मार्गदर्शक बनण्याचा प्रयत्न करावा.मुलांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक करावी.मुलांना आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा.त्याच प्रकारे आपत्ती व्यवस्थापन बाबत जागृत योग्य ती कार्यवाही करावी याबाबत महत्वाचे मार्गदर्शन केले.

अध्ययन निष्पत्ती नुसार मासिक नियोजन याविषयावर चंदन राजपूत सर यांनी मार्गदर्शन केले.शिक्षण परिषदेत गुणवत्ता संदर्भात विचारांचे देवाण घेवाण करण्यात आली.कार्यक्रमासाठी विजय पाटील,पोलीस पाटील व श्रीकांत चौधरी उपसरपंच नाचनखेडे यांची कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी विशेष उपस्थिती होती.अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील नाचनखेडे यांनी वरील विषयाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.जि.प.शाळा जोगलखेडे येथील शाळेतील मुलांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.शिक्षण परिषदे दरम्यान तालुका विभागीय गटात शोधनिबंध स्पर्धेसाठी निवड झालेले रामराव पाटील सर तर विभागीय गटातून वैयक्तिक नृत्य स्पर्धेत निवड झालेले सचिन पाटील यांचा तर मुख्यमंत्री कार्यकौशल्य योजनेच्या प्रशिक्षणार्थी म्हणून उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल श्रीमती सोनाली चंद्रकांत पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शिक्षण परिषदेसाठी भराडी,नाचनखेडे, भिलखेडे,मोरगाव,रोटवद ,नांद्रा प्र.लो,सार्वे प्र.लो.,जोगलखेडे,चिलगाव,दोंदवाडे,एकुलती या पंचकोशीतील शिक्षक उपस्थित होते.शिक्षण परिषदेसाठी शिक्षणविस्तारअधिकारी पितांबर राठोड,केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
शिक्षण परिषदेसाठी जोगलखेडे येथील शाळा व्यवस्थापन समितीने अनमोल सहकार्य केले.शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर पाटील सर हे होते.परिषदेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल केंद्रप्रमुख यांनी शाळेचे मुख्याध्यापक संदीप आव्हारकर व त्यांचे सहकारी भास्कर इंगळे त्यांचे कौतुक केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सूत्रसंचालन भास्कर इंगळे तर आभार संदीप आव्हारकर यांनी मानले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू नाथजोगी , तसेच पालकांनी सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वी केला.




