क्राईमराज्य

हॉटेलचा रुम नंबर चुकला ३० वर्षीय महिलेवर तीन जणांनी केला अत्याचार

छत्रपती संभाजीनगर-

छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये भयंकर घटना घडली आहे. एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या 30 वर्षीय विवाहितेवर तिघांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.केवळ रूम नंबर चुकल्याने ही महिला नराधमांच्या तावडीत सापडली. या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या 3 तासांत तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.पीडित महिला एका खासगी रुग्णालयात काम करते. तिला पैशांची अत्यंत गरज असल्याने तिने आपल्या एका ओळखीच्या मित्राकडे मदत मागितली होती. त्या मित्राने तिला पैसे देण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. हा मित्र हॉटेलमधील रुम नंबर 105 मध्ये थांबला होता.महिला तिथे पोहोचल्यानंतर तिने मित्रासोबत मद्यप्राशन केले आणि जेवणही केले. त्यानंतर ती फोनवर बोलण्यासाठी रूमच्या बाहेर आली. काही वेळाने पुन्हा रूममध्ये जाण्यासाठी निघालेली महिला गोंधळली आणि तिने 105 नंबर ऐवजी चुकून 205 नंबरचे दार ठोठावले.महिलेने दार वाजवताच रूम नंबर 205 मध्ये मद्यपान करत बसलेल्या तिघांनी दार उघडले. समोर महिलेला पाहून या तिघांच्या डोक्यात भलताच विचार आला त्यांनी तातडीने महिलेला खोलीच्या आत ओढले आणि दार लावून घेतले. ओरडल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी तिला बळजबरीने बिअर पाजली. त्यानंतर पहाटेपर्यंत तिघांनीही तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास संधी मिळताच पीडितेने या नराधमांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. तिने आरडाओरड करत हॉटेलच्या बाहेर धाव घेतली आणि थेट वेदांतनगर पोलिस स्टेशन गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हॉटेल गाठले. CCTV फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अवघ्या 3 तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. घनश्याम भाऊलाल राठोड, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण, किरण लक्ष्मण राठोड अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींवर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!