अंजनविहीरे शाळेचे शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न;सहलीतून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली,ऐतिहासिक,भौगोलिक,धार्मिक स्थळांची माहिती..

भडगाव-
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय अंजनविहीरे शाळेची शैक्षणिक सहल नुकतीच उत्साहात संपन्न झाली. सहलीतून विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल आणि समृद्ध महाराष्ट्राला संस्कृतीचा जो वारसा लाभलेला आहे त्याचा अभ्यास, धार्मिक स्थळांचे महत्त्व, ग्रामीण भागातील समुद्र पाहिलेला नसतो त्याचे खारे पाणी काय असते त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या नसतो त्याची प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी समुद्रातील श्रीवर्धन बीच, त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली, गड किल्ल्याची माहिती जाणून घेतली, उन्हेरे कुंड येथे गरम पाणी काय ते त्या पाण्यात कोणता घटक असतो,

महाराष्ट्रातील जे नामांकित धार्मिक स्थळे आहेत याची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेण्यासाठी शिर्डी, ओझर गणपती, लेण्याद्री गणपती, शिवनेरी किल्ला, पाली गणपती, उन्हेरे कुंड, श्रीवर्धन बीच,जेजुरी, मोरगाव गणपती, थेऊर गणपती, इत्यादी स्थळांचे ऐतिहासिक भौगोलिक व धार्मिक महत्त्व पुस्तके ज्ञानापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन शिकायला मिळते. आणि त्यांनी ते जाणून घेतले यासाठी त्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एन. पाटील यांनी वेळोवेळी प्रत्येक स्थळांची संपूर्ण माहिती अवगत करून दिली. या सहल यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, संस्थेचे सचिव प्रशांतराव विनायकराव पाटील, संस्थेच्या व्हाईस चेअरमन डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

विशेष अनमोल असे सहकार्य एरंडोल आगाराचे आगार व्यवस्थापक ( डेपो मॅनेजर) निलेश बेंडकुळे,सहाय्यक वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी, वाहतूक निरीक्षक श्रीमती योगिता बराटे, वाहतूक नियंत्रक रवींद्र पाटील, वरिष्ठ लिपिक सतीश महाजन दोघेही बसेचे वाहन चालक अविनाश (पंकज) पाटील, प्रदीप (भैया) पाटील, यांनी परिवहन मंडळाच्या लालपरी या गाड्या देऊन, एसटी महामंडळाच्या बसमधून अतिशय सुखद असा प्रवास होतो याची अनुभूती देऊन खूप चांगली सेवा दिली म्हणून शैक्षणिक सहली महामंडळाच्या बस मधूनच न्यायाव्यात असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एन पाटील यांनी मांडले आहे. सहल यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एन पाटील , स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन, नानाजी सिताराम पाटील व कमिटी सदस्य, गावातील पालक,सहल प्रमुख प्रशांत भोसले, आर यू राऊळ, प्रशांत पवार, वाघ मॅडम, योगेश पाटील,तुषार बोरसे, अजित मनोरे, अनिल सोनवणे, एच.पी. सोनवणे, महेश पाटील, भाऊसाहेब पाटील,अमोल पाटील यांनी केले. सहल अतिशय उत्साहात संपन्न झाली.





