जळगाव जिल्हा

‘शब्दाला जागणारे, विकासासाठी धावणारे’ भव्य सत्कार सोहळ्यात पक्षभेद विसरून नगरसेवक एकत्र

पाचोरा-

केशरी नंदन चॅरिटेबल ट्रस्ट, व फ्रेंड्स ग्रुप पाचोरा यांच्या वतीने “शब्दाला जागणारे, विकासासाठी धावणारे” या संकल्पनेतून पाचोरा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्षा मा. सौ. सुनिता किशोर पाटील व शेंदुर्णी नगरपरिषदेचे लोकनियुक्त भाजप नगराध्यक्ष श्री. गोविंद सेठ अग्रवाल यांच्यासह पाचोरा शहरातील सर्व २८ प्रभागांतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पाचोरा शहरातील शिवसेना तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांना पक्षभेद विसरून एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यात आले, त्यामुळे हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमास पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार किशोर आप्पा पाटील  नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोर पाटील, नगराध्यक्ष गोविंद सेठ अग्रवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.नगराध्यक्ष गोविंद सेठ अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “नगरसेवक पद लहान नसून प्रत्येक नगरसेवक हा आपल्या प्रभागाचा पालक आहे. कोणताही नागरिक मदतीसाठी आला तर त्याचे काम प्राधान्याने झाले पाहिजे. विकास करताना जात-पात नसते, सर्वसमावेशक विकास हाच खरा विकास आहे.”नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विजय शिलेदारांनी शहरात नवा इतिहास रचला आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा आम्ही प्रयत्न करू. येणाऱ्या काळात विकासरूपी कामे शहराला देऊ,” असे सांगत त्यांनी जनतेसह अग्रवाल समाजाचे आभार मानले.आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या भाषणात पाचोरा शहराशी असलेले भावनिक नाते, 2001 मधील लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा अनुभव, शांतता व विकास यांचे महत्त्व विशद केले. “शांतता असेल तरच विकास शक्य आहे. पाचोरा शहराने मला नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केशरी नंदन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहन चंद्रकांत अग्रवाल, फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष सिताराम (मुन्ना) अग्रवाल, लक्ष्मीकांत पटवारी, सतिश पटवारी, संजय पटवारी, रमेश अग्रवाल, महावीर अग्रवाल, निर्मल पटवारी, सुभाषशेठ अग्रवाल, प्रकाशशेठ पटवारी, रमेश गोपीलाल अग्रवाल, सुभाषशेठ सावा, अंकीत अग्रवाल, किशोर अग्रवाल, दिनेश अग्रवाल, अनुराग भारतीया, गोपाल अग्रवाल, जितू अग्रवाल, राजेंद्र गिंदोडिया, राजू अग्रवाल, रवि  मोर,निखिल मोर ,किसन मोर, नारायण मोर, राजेश अग्रवाल, दिनेश चंदुलाल अग्रवाल, मनीष अग्रवाल, संदीप अग्रवाल, मनोज टिबडेवाल, राहुल गिंडोडिया, महावीर गौड यांच्यासह गौरव अग्रवाल, प्रणव अग्रवाल, भावेश अग्रवाल, गोपाल पटवारी कृष्णा अग्रवाल अनिल मोर यांचा सक्रिय सहभाग होता.कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन राजेश पटवारी यांनी केले. अखेरीस उपस्थित मान्यवर, नगराध्यक्ष, नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करून आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!