पाचोरा तालुक्यातील गतीमंद अल्पवयीन मुलगी अत्याचारातुन गर्भवती; अज्ञात विरोधात गुन्हा दाखल.
पाचोरा-
तालुक्यातील एका गावात अत्याचारातून अल्पवयीन तरुणी सहा महिन्यांची गर्भवती राहिल्याची घटना उघडकीस आली.
घटने प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाचोरा तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन गतिमंद पिडीता आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. गतिमंद मुलीचे पालक नियमित शेतमजुरी कामासाठी जात असल्याची संधी साधून अज्ञाताने 16 मे 2023 रोजी पासून ते 16 ऑक्टोबर 2023 या दरम्यान अत्याचार केला असल्याची माहिती मिळत आहे.अल्पवयीन पिडीतेचे पोट मोठे होवू लागल्याने पालकांना संशय आल्यानंतर तिची जळगाव शहरातील सरकारी रुग्णालयात तपासणी केली असता पीडीता अंदाजे ५ ते ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले.
पीडीतेला विश्वासात घेवून याबाबत विचारणा केली तिला काहीही सांगता आले नाही. पीडीत मुलीच्या पालकांनी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) पोलिसात मंगळवार 17 ऑक्टोबर रोजी धाव घेत अनोळखी संशयित आरोपी विरोधात
गु.र.न.२९०/२०२३ भा.द.वी.कलम ३७६ पोक्सो कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.