सातगाव!नागरीकांनी राजकारण बाजूला ठेवल्यास गाव विकासासाठी दत्तक घेईल -आमदार किशोर आप्पा पाटील.
पाचोरा –
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे जलजीवन योजनेचे उद्घाटन संपन्न, गावातील नागरिकांनी राजकारण बाजूला ठेवल्यास गाव विकासासाठी सातगाव दत्तक घेईल.जलजीवन योजनेच्या नवीन पाण्याच्या टाकीच्या भूमी पूजन प्रसंगी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी म्हटले आहे.
सातगाव डोंगरी येथे जलजीवन योजने साठी दोन कोटीच्या दरम्यान रूपये मंजूर झाले असून, सदर गृपग्रामपंचायत मध्ये सातगाव-गहुले- तांडा या तिन्ही गावांचा समावेश आहेत. साधारणता दहा हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेले हे मोठे गाव असून, गावातील रस्ते, भूमिगत गटारी, तसेच गावातील रस्त्यावर अतिक्रमण झालेले काढणे या तिन्ही गोष्टी गावाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असून जर गावातील पक्ष पातळीवरील नागरिकांनी आपापले मतभेद दूर ठेवून राजकारण न करता एकमताने मला साथ दिली. तर गावाच्या विकासासाठी गाव मी दत्तक घेईल. असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सर्व पक्षीय गट-तट सोडून गाव पुढारी सदर कार्यक्रमासाठी जमा झाले होते. यावेळी जि प सदस्य मधुकर काटे ,प्रा. भागवत महालपुरे, सरपंच उषाबाई सुभाष पाटील, उपसरपंच शकीलाबाई अब्बास तडवी, ज्ञानेश्वर चौधरी, ज्ञानेश्वर अहिरे, माझी सभापती सिकंदर तडवी, देवदास वाघ, अशोक गायकवाड, शंकर पवार, आकाश डांबरे, शरीफका पठाण, संजय चव्हाण, राजू बोरसे, गोकुळ परदेशी, हिम्मत मनगटे, रज्जाक तडवी, आप्पा पाटील, ग्रामपंचायत सर्व सदस्य विकास सोसायटीचे सदस्य, जावेद हवलदार, अण्णा मराठे, आबा भगवान पाटील, विक्रम वाघ, प्रकाश आवारे, भरत राठोड, अंबादास आल्हाट, एकनाथ बच्छे, कॉन्ट्रॅक्टर गोपाल चिंचोले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.